Home क्रीडा उस्मान ख्वाजाकडे पुरावा असेल…! सँडपेपरगेट प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची प्रतिक्रिया

उस्मान ख्वाजाकडे पुरावा असेल…! सँडपेपरगेट प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची प्रतिक्रिया

0
उस्मान ख्वाजाकडे पुरावा असेल…! सँडपेपरगेट प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची प्रतिक्रिया
उस्मान ख्वाजाकडे पुरावा असेल...! सँडपेपरगेट प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची प्रतिक्रिया (Photo: ANI)

ऑस्ट्रेलियन संघ 2018 मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर होता आणि सँडपेपर प्रकरण घडलं होतं. चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर केला गेला होता. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला आणि क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या वादानंतर डेविड वॉर्नरसह तीन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. आता हे प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालं आहे. त्याला निमित्त ठरलं ते उस्मान ख्वाजाच आत्मचरित्र असलेलं सबर हे पुस्तक.. या पुस्तकात सँडपेपरगेट प्रकरणावर धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू डेविड वॉर्नरने या प्रकरणी उस्मान ख्वाजाला पाठिंबा दिला आहे. या प्रकरणाबाबत संपूर्ण संघाला माहिती होती, असा धक्कादायक खुलासा या पुस्तकात केला होता. तसेच प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघात दोन गट पडले आहेत. या प्रकरणावर दक्षिण अफ्रिकन खेळाडूंच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. कागिसो रबाडानेही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाला कागिसो रबाडा?

जोहान्सबर्ग येथे एका पत्रकार परिषदेत कागिसो रबाडाला सँडपेपरगेट प्रकरणावर प्रश्न विचारला गेला. तेव्हा कागिसो रबाडा म्हणाला की, ‘माझ्या मते ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या परिस्थितीतून जात आहेत, तो आपला विषय नाही. तो आपला मुद्दा नाही. साहजिकच, ही ऑस्ट्रेलियाची वैयक्तिक बाब आहे आणि मला वाटत नाही की आपला त्याच्याशी काही संबंध आहे.’ क्रिकबझच्या वृत्तानुसार, एक दक्षिण आफ्रिकन म्हणाला की, ‘मी ख्वाजाचे पुस्तक वाचलेले नाही, तसेच मला त्याच्या दाव्यांमध्ये किंवा विधानांमध्ये रस नाही. मला आशा आहे की त्याने जे काही म्हटले आहे, त्यासाठी त्याच्याकडे काही पुरावे असतील.’

https://www.prahaar.in/2026/11/14/ind-vs-nz-5th-odi-live-streaming-when-and-where-to-watch-the-fifth-odi-match-between-india-and-new-zealand-find-out-here/

पॅट कमिन्सने आरोप फेटाळून लावले

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने उस्मान ख्वाजाने त्या पुस्तकात केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पॅट कमिन्सने स्पष्ट केलं की, मैदानावर सँडपेपर नेला जात होता असे म्हणताना ख्वाजाचा अर्थ जर ‘आम्हाला सर्वांना माहीत होते’ असा असेल, तर तो 100 टक्के चुकीचा आहे आणि हे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here