मुंबई: अनेकदा तुम्ही लांबपल्ल्याचा प्रवास RAC मध्ये केला असेल. RAC म्हणजे, एकाच सीटवर एकाच वेळी दोन प्रवाशी प्रवास करतात. पण आता हिच प्रवाशांची कटकट रेल्वेकडून बंद करण्याचा विचार सुरू आहे. भारतीय रेल्वे आपल्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर कसा होईल? या विचारामध्ये आहे. अनेक वर्षांपासून रेल्वे आरक्षण प्रणालीचा भाग असलेली RAC (Reservation Against Cancellation) प्रणाली रद्द करण्यावर किंवा त्याचे नियम बदलण्यावर चर्चा सुरू आहे. सध्याच्या नियमांनुसार, जेव्हा लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असते आणि कन्फर्म तिकीट उपलब्ध नसते, तेव्हा रेल्वेकडून RAC तिकीट जारी करण्यात येते. प्रवास करताना प्रवाशांना, एकाच बर्थ किंवा सीटवर दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असते, ज्यामध्ये दोन्ही प्रवाशांना सीटच्या अर्ध्या भागावर बसून किंवा वाकून प्रवास करावा लागतो.
https://www.prahaar.in/2026/11/14/ranbir-kapoors-ramayana-creates-a-stir-at-the-box-office-hits-the-%e2%82%b91111-crore-mark-in-just-9-days/
मात्र, लांब पल्ल्याच्या प्रवासात आरएसी तिकिटांवर झोपण्याची किंवा अर्ध्या जागेवर बसण्याची सक्ती प्रवाशांसाठी एक समस्या बनत आहे. पण आता हिच RAC ची व्यवस्था बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेसला नाहीये. जर तुमच्याकडे प्रवासाचं कन्फर्म तिकिट असेल तरच, तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करु शकणार आहेत. एका अर्थी रेल्वेने एक्स्प्रेसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, त्याच दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेच्या आधारे जुन्या नियमांचा आढावा घेतला जात आहे. रेल्वे अधिकार्यांच्या मते, जेव्हा प्रवाशांना ट्रेनमध्ये झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी पूर्ण जागा मिळत नाही, तेव्हा त्यांच्याकडून पूर्ण बर्थचे शुल्क आकारणे अन्यायकारक आहे. आरएसी तिकिटांमुळे प्रवाशांना प्रवासाच्या वेळी प्रत्यक्षात अनेकदा मोठ्या समस्या निर्माण होतात.
https://www.prahaar.in/2026/11/14/ranbir-kapoors-ramayana-creates-a-stir-at-the-box-office-hits-the-%e2%82%b91111-crore-mark-in-just-9-days/
नेमकं RAC म्हणजे काय? RAC सीट प्रवाशांना कुठे उपलब्ध होते? RAC मध्ये प्रवाशाला स्वतंत्र बर्थ दिली जात नाही. सामान्यतः दोन आरएसी प्रवाशांना एक साइड लोअर बर्थ दिली जाते. दिवसा या बर्थवर दोन्ही प्रवासी बसू शकतात, तर रात्री दोघांनाही त्या एकाच बर्थवर झोपावे लागते. विशेष म्हणजे, दोन्ही प्रवासी एका तिकिटाचे पूर्ण भाडे भरतात. मात्र, त्यांना झोपण्याची स्वतंत्र जागा मिळत नाही. याच मुद्द्यावर रेल्वे प्रशासनात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मिडिया रिपोर्टनुसार, एका संसदीय समितीने या व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे. प्रवाशाला झोपण्यासाठी पूर्ण बर्थ मिळत नसेल, तर त्यांच्याकडून पूर्ण भाडे आकारणे कितपत योग्य आहे, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/14/madhya-pradesh-khargone-earthquake-strong-tremors-felt-second-time-in-25-days-panic-among-citizens/
RAC सीटवर एकाचवेळी पुरूष आणि महिला प्रवाशाला प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था शोधताना रेल्वे तिकीट तपासकांना (टीटीई) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सणासुदीच्या काळात, विशेषतः दिवाळी आणि छठ पूजेच्या वेळी, भारतीय रेल्वे मार्गांवरील मेल- एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशा वेळी, ज्या प्रवाशांना तातडीने आपल्या घरी पोहोचायचे असते, त्यांच्यासाठी RAC हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. भारतीय रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये तिकीटाशिवाय प्रवास करण्यास सक्त मनाई असून तो बेकायदेशीर आहे, त्यामुळे ज्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही, त्यांना ही सुविधा रेल्वेने कायदेशीररित्या प्रवास करण्याची संधी देते.
https://www.prahaar.in/2026/11/14/a-bus-traveling-on-the-yamuna-expressway-caught-fire-thanks-to-the-drivers-quick-thinking-a-major-tragedy-was-averted-there-were-40-passengers-on-board/
मात्र, आजच्या आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित सुविधा लक्षात घेता, अनेक वर्षांपूर्वी लागू केलेल्या या नियमाचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे आता जाणवत आहे. रेल्वेच्या या संभाव्य निर्णयामुळे भविष्यात रेल्वे प्रवास आणखी आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.