एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. ओमानमधील अल अमिरात क्रिकेट ग्राउंडवर हा महामुकाबला रंगणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक सकाळी 10 वाजता होणार आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून एकतर्फी पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशवर 9गडी राखून मात करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या साखळी फेरीत पाकिस्तानने भारताचा 3 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून त्या पराभवाची परतफेड करण्याची आणि आशिया चषकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे आहे.