जांभळी साडी आणि डिझायनर टोपी, सई  ताम्हाणकरचा दिवाळी पार्टी लुक 

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर फोटोज शेयर केले आहेत.

सईने फोटोमध्ये गडद जांभळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. यात तिने डीप व्ही नेक ब्लॉऊज परिधान केला आहे.

सईचा हा अनोखा लुक चाहत्यांना आवडला असून तिच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

डोक्यावरील पारंपरिक डिझाइनची टोपी या लूकला एक वेगळीच ओळख देत आहे.