Home ताज्या घडामोडी Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच गांधी यांचा ‘फुल-टाइम’ उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच गांधी यांचा ‘फुल-टाइम’ उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

0
Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच गांधी यांचा ‘फुल-टाइम’ उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करुन राहुल गांधी स्वत:चेच हसे करुन घेत आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारायच्या, हवेत तीर सोडायचे आणि रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच गांधी यांचा ‘फुल-टाइम’ उद्योग झालाय, असा टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांच्यावर एक्स पोस्टमधून टीका केली.

https://www.prahaar.in/2026/11/13/umesh-patil-clarifies-no-ncp-merger-talks-underway-neither-formal-nor-informal-discussions/

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक्स पोस्ट

उथळ पाण्याला खळखळाट फार… राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने इतके पछाडले आहे. त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र मोदीजीच दिसतात. सत्य हेच आहे की, जोपर्यंत ते पंतप्रधानांचे नाव घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची बातमीही होत नाही आणि माध्यमांच्या चर्चेतही ते टिकू शकत नाहीत. स्वतःची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आता ते ‘फोन टॅपिंग’सारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ना कोणता ठोस मुद्दा, ना विकासाचे व्हिजन, ना दाव्यांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा! फक्त खिशात पुरावे असल्याच्या पोकळ बाता मारायच्या, हवेत तीर सोडायचे आणि रोज नवा ‘फेक नॅरेटिव्ह’ रचायचा, हाच त्यांचा आता ‘फुल-टाइम’ उद्योग झाला आहे. एकीकडे देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचे नवे शिखर गाठत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांनी स्वतःचेच हसे करून घेत आहेत. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण आज त्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here