एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. या सामन्यात भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसाने येणार आहे. पाकिस्तानने साखळी फेरीत भारताचा 3 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारतीय संघाकडे साखळी फेरीतील पराभवाचा वचपा आणि जेतेपद जिंकण्याची नामी संधी आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, गतविजेता पाकिस्तान संघ आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी आणि तिसरे 19 वर्षांखालील आशिया कप विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. भारताने या स्पर्धेवर आठ वेळा नाव कोरलं आहे. आता विक्रमात भर घालणाऱ्या नवव्या ट्रॉफीच्या शोधात असेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 19 वर्षांखालील आशिया कपचा अंतिम सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना शनिवारी, 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान 19 वर्षांखालील आशिया कप अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेकीचा कौल हा 10 वाजता होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 19 वर्षांखालील आशिया कपचा अंतिम सामना कुठे खेळला जाईल?
विजेतेपदाचा सामना अल अमेरत येथील अमेरत क्रिकेट मैदानावर (मिनिस्ट्री टर्फ 2) आयोजित केला जाईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान 19 वर्षांखालील आशिया कप अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान 19 वर्षांखालील आशिया कप अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) कुठे पाहता येईल?
सामन्याचे थेट प्रक्षेपण SonyLIV ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
https://www.prahaar.in/2026/11/13/ind-vs-nz-4th-odi-virat-kohli-got-out-for-a-duck-equalling-an-unwanted-record-held-by-sachin-tendulkar/
भारत विरुद्ध पाकिस्तान 19 वर्षांखालील आशिया कप 2026 संघ:
भारत 19 वर्षाखालील संघ
| खेळाडू | भूमिका |
| लक्ष्य राजेश रायचंदानी (सी) | बॅटर |
| आर्यवीर सेहवाग | बॅटर |
| अन्वय द्रविड (यष्टीरक्षक) | यष्टीरक्षक-फलंदाज |
| अर्जुन राजपूत | फलंदाजी अष्टपैलू |
| इशान सूद | गोलंदाज |
| काव्या पटेल | गोलंदाज |
| मनाल चौहान | फलंदाजी अष्टपैलू |
| मोहित उल्वा | गोलंदाज |
| यशवीर गौड | फलंदाजी अष्टपैलू |
| व्हीके विनीत | गोलंदाज |
| यशबर्धन चौहान | अष्टपैलू |
| रजत बघेल | यष्टीरक्षक-फलंदाज |
| शाविन विनोद | गोलंदाज |
| आर्यन सावसानी | बॅटर |
| कुशाग्र ओझा | अष्टपैलू |
पाकिस्तान 19 वर्षांखालील संघ
| खेळाडू | भूमिका |
| उस्मान खान | बॅटर |
| जहांगीर बिलाल | बॅटर |
| अब्दुल कादिर | यष्टीरक्षक-फलंदाज |
| अहमद हुसेन | अष्टपैलू |
| अली रझा | वेगवान गोलंदाज |
| हमजा जहूर (यष्टीरक्षक) | यष्टीरक्षक-फलंदाज |
| हसनेन अब्बास दार | अष्टपैलू |
| मोहम्मद सय्यम | वेगवान गोलंदाज |
| फरहान युसूफ (c) | बॅटर |
| निकाब शफीक | डावखुरा फिरकी गोलंदाज |
| रिझवानुल्लाह | वेगवान गोलंदाज |
| हुजैफा अहसान | बॅटर |
| अब्दुल सुभान | वेगवान गोलंदाज |
| मोहम्मद हुजैफा | डाव्या हाताने मनगट फिरवणे |
| हयाम खान | बॅटर |