न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मैदानात हजेरी लावली आणि तंबूत परतले. पहिल्याच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर तंबूत होते. यात विराट कोहली शून्यावर बाद झाला आणि सचिनच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. (Photo: ANI)वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकर इतकाच शून्यावर बाद झाला आहे. सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये 20 वेळा शून्यावर बाद झाला आहे. आता या विक्रमाची बरोबरी विराट कोहलीने केली आहे. विराट कोहलीही 20वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo: ANI)पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. त्यामुळे डाव सावरण्याचं त्याचावर दडपण होतं. विराट कोहलीने तीन चेंडू खेळले, पण चौथ्या चेंडूवर विकेट दिली. मॅट हेनरी आत येणाऱ्या चेंडूवर चुकला आणि स्टम्प उडाल्या. (Photo: ANI)विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याची बॅट काही चालली नाही. मागच्या चार वनडे सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद झाला. (Photo: ANI)विराट कोहली यापूर्वी न्यू चंदीगड येथील मैदानात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नव्हता. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सने त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्ड केलं होतं. (Photo: ANI)