Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिकमध्ये आरपीएफची मोठी कारवाई ! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये संशयित तरुणाला पकडले, बॅगेतील रोकड पाहून आरपीएफही चक्रावले

Nashik : नाशिकमध्ये आरपीएफची मोठी कारवाई ! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये संशयित तरुणाला पकडले, बॅगेतील रोकड पाहून आरपीएफही चक्रावले

0
Nashik : नाशिकमध्ये आरपीएफची मोठी कारवाई ! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये संशयित तरुणाला पकडले, बॅगेतील रोकड पाहून आरपीएफही चक्रावले

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत एका संशयित तरुणाकडून तब्बल 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान गुरुवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला रोखले. ट्रेन क्रमांक 22112 अमृत भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा हा तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बॅग घेऊन जात असताना जवानांना त्याच्यावर संशय आला.

बॅगेत आढळली कोट्यवधींची रोकड

आरपीएफ जवानांनी तरुणाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एकूण 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड आढळून आली. संबंधित तरुणाची ओळख संदीप बाळासाहेब भामरे अशी झाली आहे. तो मूळचा आटपाडी, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून सध्या जळगावमधील भवानी पेठ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/nashik-following-an-email-threat-the-south-gate-of-the-kalaram-temple-has-been-closed-and-tight-police-security-has-been-deployed-in-panchavati/

रोकड कुठून आली? आरपीएफकडून चौकशी सुरू

इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याबाबत आरपीएफ जवानांनी तरुणाकडे विचारणा केली. ही रक्कम नेमकी कुठून आणली, कोणाची आहे आणि ती कुठे नेली जात होती, याबाबत त्याच्याकडे माहिती मागण्यात आली. मात्र, रोकडीच्या स्रोताबाबत समाधानकारक स्पष्टीकरण तसेच वैध कागदपत्रे सादर करण्यात तरुणाला अपयश आले.

यानंतर आरपीएफ जवानांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. या कोट्यवधींच्या रोकडमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास केला जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून विशेष दक्षता घेतली जात असतानाच ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here