Home महाराष्ट्र नाशिक Nashik : धमकीच्या ई-मेलनंतर काळाराम मंदिराचा दक्षिण दरवाजा बंद, पंचवटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nashik : धमकीच्या ई-मेलनंतर काळाराम मंदिराचा दक्षिण दरवाजा बंद, पंचवटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

0
Nashik : धमकीच्या ई-मेलनंतर काळाराम मंदिराचा दक्षिण दरवाजा बंद, पंचवटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नाशिक : पंचवटी येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर देवस्थानला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मंदिर प्रशासन आणि पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंदिराचा दक्षिण दरवाजा भाविकांसाठी बंद करण्यात आला असून, सध्या मुख्य प्रवेशद्वार आणि उत्तर दरवाज्यातून भाविकांची ये-जा सुरू आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी श्री काळाराम मंदिर देवस्थानला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. या घटनेनंतर पंचवटी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर परिसराची कसून तपासणी केली. यासाठी बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली. तपासणीनंतरही खबरदारीचा भाग म्हणून दक्षिण प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंदिरात दररोज सुमारे आठ ते दहा हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख ठेवताना अडचणी निर्माण होतात. पोलिसांच्या सूचनेनुसार दक्षिण दरवाजा बंद करण्यात आला असून, पुढील काही दिवस तो बंदच राहणार आहे. मंदिराचा पूर्व दरवाजा रामकाल पथाच्या कामामुळे यापूर्वीच बंद आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/chhagan-bhujbal-a-discussion-regarding-a-merger-took-place-between-ajit-pawar-and-jayant-patil-in-my-presence/

पंचवटीतील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाशिकमध्ये पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गोदावरी नदीकाठावरील श्री कपालेश्वर मंदिर, सुंदर नारायण मंदिर तसेच बारा वर्षांतून एकदा उघडणारे श्री गंगा गोदावरी मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गोदावरी मंदिर परिसरात दर्शनासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागत असून, कपालेश्वर मंदिरातही गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे.

रामकुंड, सीतागुंफा आणि नौकाविहार पर्यटकांचे आकर्षण

तपोवनातील रामाची मूर्ती, सीतागुंफा आणि रामकुंड परिसरातही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. गोदावरी नदीकाठावरील ध्वजस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी तसेच रामकुंड परिसरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. दुसरीकडे गांधी तलावातील नौकाविहार पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. नाशिकसह परराज्यांतून आलेले पर्यटक जलसफारीचा आनंद घेत आहेत. एकीकडे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली असताना, दुसरीकडे काळाराम मंदिराला मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी आणि गोदाकाठ परिसरात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here