Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेज क्रमांक 332 वर वाहतूक कोंडीत उभ्या असलेल्या वाहनांच्या ताफ्यात नागपूरकडून मुंबईकडे जाणारा एक भरधाव ट्रक वेगाने घुसला मागून येणारी 12-15 भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. या साखळी अपघातात तब्बल 12 ते 15 वाहने एकमेकांवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. प्रवासी वाहनांतील 20 ते 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/13/bloody-terror-in-the-alandi-municipal-council-area-a-youth-attacked-by-two-assailants/
समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवर एक टँकर पलटी झाला होता. क्रेनच्या मदतीने हा पलटी झालेला टँकर बाजूला काढण्याचे काम सुरू होते. वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवली होती. त्यामुळे घटनास्थळी सुमारे 40 ते 50 वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचवेळी नागपूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक थेट समोर उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. सकाळच्या अपघातामुळे आधीच आधीच खोळंबल्या वाहतुकीला या अपघाताचा फटका बसला. रस्ता रिकामा होईपर्यंत थांबलेल्या प्रवाशांना ट्रकने गाठले. वाहनांची रंग असताना चालकाला ट्रक का थांबवता आला नाही? हा महत्वाचा प्रश्न समोर येत आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पहिल्या धडकेने वाहन पुढे ढकलली गेली आणि त्या मागे डहाकेची मालिका सुरूच झाली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
View this post on Instagram
या अपघातामुळे महामार्गावर ट्रकच्या रांगा लागल्या असून, घटनेची माहिती मिळताच मदतकार्य आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे. अपघातात नेमके किती जण जखमी झाले किंवा जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.