Home क्रीडा IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…

IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…

0
IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…
IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला... (Photo: ANI)

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात कमबॅक केलं आणि भारताला 244 धावांनी पराभूत केलं. खरं तर न्यूझीलंडसाठी हा सामना करो या मरोची लढाई होता. कारण भारताने या सामन्यात आधीच 2 विजयांची आघाडी घेतली होती. त्यात तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडवायची तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. असं असताना चौथ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने मालिका बरोबरीत सोडवण्याचा आशा जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे, मालिका विजयासाठी टीम इंडियाला पाचव्या सामन्यात काहीही करून जिंकावं लागेल. चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी 333 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 89 धावांवर गारद झाला आणि हा सामना न्यूझीलंडने 244 धावांनी जिंकला. या विजयासाठी पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. चौथ्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने आपलं म्हणणं मांडलं. नेमकं काय चुकलं ते त्याने सांगितलं.

काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?

टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही पाहिलं की, खेळपट्टीच्या बाबतीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात खूप मोठा फरक होता. पण हेन्रीने पहिल्या चेंडूपासूनच ज्याप्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, त्याचं श्रेय त्याला द्यायलाच हवं. मला वाटतं ते सनसनाटी होतं.’ श्रेयस अय्यर शॉर्ट-बॉलच्या डावपेचांवर आणि खेळपट्टीवरील गोलंदाजीच्या आदर्श लांबीवर म्हणाला की, ‘मला वाटतं, पहिल्या डावात आम्ही जवळजवळ सर्व काही करून पाहिलं, ज्याप्रकारे ते आक्रमक खेळत होते. आणि आम्हाला वाटलं की खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होती, कारण त्यानंतर त्यांनी 330 धावा केल्या होत्या. अर्थात, दोन-चार झेल सुटले, पण सामन्यात असं नक्कीच घडतं. पण हो, जेव्हा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये गेलो, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही सहजपणे पाठलाग करू. पण ज्याप्रकारे चेंडू आत-बाहेर वळत होता, त्यामुळे मनातल्या मनात ठरवता येत नव्हतं की मी अशाप्रकारे खेळणार आहे. किंवा तुम्ही खेळपट्ट्या पाहिल्या तरी, कोणीही सहज विकेट गमावली नाही. ते चांगले चेंडू होते.’

https://www.prahaar.in/2026/11/13/ind-vs-nz-new-zealand-triumphs-in-the-fourth-odi-defeats-india-by-244-runs/

कर्णधार श्रेयस अय्यर पुढील सामन्याच्या तयारीबद्दल म्हणाला की, ‘अर्थातच, हा सामना विसरून गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये काय चुकले याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. पण हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आपण दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्या सामन्यातून खूप प्रेरणा घेऊन, नव्या मानसिकतेने मैदानात उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here