Home क्रीडा IND vs NZ 4th ODI: चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची सरशी, भारताला 244 धावांनी केलं पराभूत

IND vs NZ 4th ODI: चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची सरशी, भारताला 244 धावांनी केलं पराभूत

0
IND vs NZ 4th ODI: चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची सरशी, भारताला 244 धावांनी केलं पराभूत

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकूनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदाना उतरला होता. मात्र या सामन्यात भारताची कामगिरी निराशाजनक दिसून आली. पहिल्यांदा गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात, त्यानंतर फलंदाजीतही भारताने नांगी टाकली. न्यूझीलंडने 50 षटकात सर्व गडी गमवून 333 धावा केल्या आणि विजयासाठी 334 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारताची त्रेधातिरपीट उडाली. पहिल्या षटकात भारताने एकही धाव न काढता तीन विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना खातंही खोलता आलं नाही. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 334 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने कशीबशी 89 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडने भारताला चौथ्या वनडे सामन्यात 244 धावांनी पराभूत केलं.

भारताचा डाव

न्यूझीलंडने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती नाजूक होती. एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही. पहिल्या षटकात मॅट हेनरीने भारताचे तीन गडी बाद केले. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माची विकेट काढली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर विराट कोहली आणि सहाव्या चेंडूवर श्रेयस अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला. ऋतुराज गायकवाडही काही खास करू शकला नाही. ऋतुराज गायकवाडने 13 चेंडूत 5 धावा केल्या आणि काईल जेमिसनला विकेट दिली. त्यानंतर इशान किशन आणि अक्षर पटेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडीही फार काळ टिकू शकली नाही. इशान किशन 27, तर अक्षर पटेल 21 धावा करून बाद झाले. आकिब नबीचा खेळही 5 धावांवर आटोपला. कुलदीप यादवनेही 4 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून तंबूत परतला.  नमन धीरने 24 चेंडूत 21 धावा करत थोडी फार झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण मोठी खेळी करू शकला नाही. गुरनूर ब्रार 2 धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव 89 धावांवर आटोपला.

https://www.prahaar.in/2026/11/13/ind-vs-nz-4th-odi-india-scored-zero-runs-and-lost-three-wickets-in-the-very-first-over-rohit-and-virat-out-on-duck/

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट (विकेटकीपर), विल यंग, ​​निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टियन क्लार्क, काईल जेमिसन, मॅट हेन्री, मॅथ्यू फिशर.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here