Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात ‘कैरेक्टर ढीला’ या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. या वादनानंतर स्काऊटने चक्क स्वतःचे केस कापून टक्कल केले आहे. या घटनेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून घरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
बिग बॉस 20 च्या घरात स्काउट ओपी एकापाठोपाठ एक वादांच्या केंद्रस्थानी सापडला आहे. लव्ह गिल आणि स्काऊट ओपीच्या नात्यामुळे बिग बॉस च्या घराबाहेर दोघेही प्रचंड ट्रोल होत होते. त्यांनतर आता या दोघांमधील वाद देखील चर्चेचा विषय बनला आहे. एका टास्कदरम्यान यंग डीएसए सोबत झालेल्या जोरदार भांडणानंतर, त्याचा लव्ह गिलसोबत पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. जसा वाद वाढत गेला, तसे एका नवीन प्रोमोमध्ये स्काउटने आपले डोके मुंडून करून एक अनपेक्षित पाऊल उचलल्याचे दिसले, ज्यामुळे घरातील इतर सदस्य आश्चर्यचकित झाले.
https://www.prahaar.in/2026/11/13/important-news-for-the-residents-of-nashik-has-your-name-been-removed-from-the-electoral-roll-do-not-worry-the-election-commission-has-provided-another-opportunity/
‘तेरे पँट मै तो नाडा था ही नहीं’
गुल्लू आणि लव्ह गिलच्या फ्लीर्टींगवरून तिने सलमान खानच्या ‘ रेडी’ चित्रपटातील ‘ कॅरेक्टर ढीला’ हे गाणे गाऊन स्काउट ओपीला चिडवले. त्याच्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, “मैं करूं तो सा** कॅरॅक्टर ढीला है।” त्यावर स्काऊटने सांगितले, ” आधीच सैल होतं, तुला आणखी सैल करण्याची गरज नव्हती.”
View this post on Instagram
यावर लव्हने सुरुवातीला हसून उत्तर टाळले आणि म्हणाली, ” बकवास करू नकोस. ” त्यानंतर स्काउटने आणखी एक टिप्पणी केल्यावर त्या संवादाला एक गैरसोयीचे वळण लागले. स्काऊट म्हणाला, हमारी पँट मैं नाडी लागी है, तेरे पँट मैं नाडे थे ही नही. यावरून वादाला सुरुवात झाली.
दरम्यान, घरातील स्काउटचा हा एकमेव वाद नव्हता. त्याच एपिसोडमध्ये आधी, एका टास्कदरम्यान त्याचा यंग डीएसए सोबत मोठा वाद झाला होता. जेव्हा स्काउटने आक्रमकपणे यंगला मागे ढकलले, तेव्हा शाब्दिक चकमक वाढली, ज्यामुळे बिग बॉसला कारवाई करावी लागली.
या दोन्ही वादविवादानंतर, निर्मात्यांनी स्काउटला एका पूर्णपणे वेगळ्या अवतारात दाखवणारा प्रोमो प्रदर्शित केला. या क्लिपमध्ये, तो बाथरूममध्ये आपले सर्व केस काढताना दिसत आहे. त्याचा हा नवीन लूक पाहून माही विज आणि लव्ह गिल यांना स्पष्टपणे आश्चर्य वाटले.
We’ve seen promos like this being cut throughout the season, and it’s high time we addressed it. Week after week, a narrative appears to be built around Scout in the name of entertainment.
Time and again, the promos create one impression, but when the full episode airs, the context often tells a very different story. That’s exactly what raises questions. Why are selective moments consistently being used in a way that leads to a negative perception of Scout before viewers even watch the complete episode?
For someone who has earned the love and respect of millions over the years, this feels unfair. Entertainment should never come at the cost of someone’s reputation.
We stand firmly with ScoutOP.
— sc0utOP (@scouttanmay) November 12, 2026
दरम्यान, या सगळ्यावर स्काऊट च्या टीमने शोच्या निर्मात्यांवर ‘कथानक’ रचल्याबद्दल टीका केली आहे. टीमने म्हटले आहे की, काही विशिष्ट क्षणांचा वारंवार वापर केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या गेमरबद्दल एक चुकीचा समज निर्माण होत आहे. “वारंवार, प्रोमोज एक छाप पाडतात, पण जेव्हा संपूर्ण एपिसोड प्रसारित होतो, तेव्हा त्यातील संदर्भ अनेकदा एक पूर्णपणे वेगळीच गोष्ट सांगतो. नेमकी हीच गोष्ट प्रश्न निर्माण करते. प्रेक्षकांनी संपूर्ण एपिसोड पाहण्यापूर्वीच, स्काउटबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होईल अशा प्रकारे निवडक क्षणांचा सातत्याने वापर का केला जात आहे?” असे स्काऊटच्या टीमने म्हंटले आहे.