Home ब्रेकिंग न्यूज Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

0
Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल
धक्कादायक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी ई-मेल मिळाल्याने खळबळ (Photo google)

मुंबई : मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आता शहरातील विविध बँकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले आहेत. या प्रकारामुळे बँकिंग क्षेत्रासह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/shooting-incident-involving-a-security-guard-at-rashtrapati-bhavan-on-diwali-night-both-accused-arrested-prime-suspect-injured-in-a-police-encounter/

12 नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला या धमकीच्या ई-मेलबाबत माहिती मिळाली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेसह कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण 6 ठिकाणांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल पाठवण्यात आले होते.

या धमकीनंतर संबंधित यंत्रणांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. धमकीचे ई-मेल कोणी पाठवले आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास सुरू आहे.

मुंबईसह पुण्यातही धमकीचे ई-मेल

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबई महापालिकेचे महापौर कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीएसएमटी बस स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल मिळाला होता.

आता मुंबईतील बँकांनाही धमकीचे ई-मेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या सर्व धमक्यांमागे एकच व्यक्ती किंवा गट आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here