Avinash Arun Second Marriage: नुकताच ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ (Prahaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण हे अलीकडेच त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत होते. मराठी चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण पुन्हा चर्चेत आले आहेत. पण यावेळी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
‘किल्ला’, ‘थ्री ऑफ अस’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या दिग्दर्शनाचा वेगळा ठसा उमटवणारे अविनाश अरुण यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. आपल्या सोशल मीडियावर त्यांनी अधिकृत पोस्ट केले आहे. अविनाश अरुण यांनी नुकतंच, सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत (Second Wife) फोटो शेअर केला आहे. आणि त्या फोटोला ‘Just Married’ असं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. अविनाश अरूण यांनी फोटो शेअर करताच, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
https://www.prahaar.in/2026/11/12/bomb-threat-to-mumbai-and-pune-5-locations-including-the-mayors-office-under-the-scanner/
अविनाश अरूण यांनी 11 नोव्हेंबर 2026 रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रितुजा असं आहे. बऱ्याचवेळी रितुजा आणि अविनाश एकत्र प्रमोशनल इव्हेंटमध्ये स्पॉट झाले होते. दोघेही रिलेशनशिप होते, असे सांगितले जात आहे. अविनाश अरुण यांचं पहिलं लग्न मराठी अभिनेत्री कांदबरी कदम यांच्यासोबत झालं होतं. पण काही कारणास्तव दोघेही विभक्त झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी फोटोला लक्षवेधी कॅप्शन देत ‘11.11.26, आम्ही एक इच्छा केली, आणि ती इच्छा पूर्ण झाली’, असं लिहिलं आहे. तर या फोटोवर सिनेकलाकार, इंडस्ट्रीतील दिग्गज सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
अविनाश अरूण यांनी अनेक सिनेमा तसेच वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचा अलिकडेच ‘प्रहार’ हा सिनेमा रिलीज झाला होता. याव्यतिरिक्त ‘पाताल लोक’, ‘पाताल लोक 2’ या वेब सिरीजचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. तसेच त्यांच्या ‘किल्ला’ या पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक मिळवलं होतं. या चित्रपटाला बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिस्टल बेअर पुरस्कार मिळाला होता. तसंच 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मानही मिळाला होता. दरम्यान, आता अविनाश अरुण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुसऱ्या लग्नामुळे अविनाश अरुण चर्चेत आले आहेत.