Home क्राईम Mumbai Crime News: लोकलमध्ये संतापजनक प्रकार! तरुणीची छेडछाड; विरोध करताच रुळांवर ढकलले

Mumbai Crime News: लोकलमध्ये संतापजनक प्रकार! तरुणीची छेडछाड; विरोध करताच रुळांवर ढकलले

0
Mumbai Crime News: लोकलमध्ये संतापजनक प्रकार! तरुणीची छेडछाड; विरोध करताच रुळांवर ढकलले
लोकलमध्ये संतापजनक प्रकार! तरुणीची छेडछाड; विरोध करताच रुळांवर ढकलले (Photo AI)

Mumbai Crime News: बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेडछाड केल्यानंतर तिला रेल्वे रुळांवर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 नोव्हेंबर रोजी नायगाव रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. या घटनेत तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने कोपरापासून कापावा लागला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/12/terrorist-attack-in-jammu-and-kashmir-bodies-of-two-missing-spo-personnel-found-they-were-shot-dead/

छेडछाडीला विरोध केला, आरोपीने रुळांवर ढकलले

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, ती बोरिवलीहून नायगावला जाण्यासाठी लोकलमध्ये चढली होती. नायगाव स्थानक जवळ येत असताना एका व्यक्तीने तिच्या छातीजवळ चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून छेडछाड केली. तरुणीने त्याला विरोध केला आणि चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद आणि शिवीगाळ झाली.

तरुणीच्या आरोपानुसार, नायगाव स्थानकात लोकल थांबलेली असताना आरोपीने तिला जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून रेल्वे रुळांवर पडली. फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली आला. या अपघातात तिचा हात कोपरापासून कापावा लागला. तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, 16 टाके पडल्याचे तिने सांगितले.

‘मला फक्त न्याय हवा’; पीडितेची आपबिती

या घटनेबाबत बोलताना पीडित तरुणीने आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. आरोपीने वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तिने केला. विरोध करूनही तो थांबला नाही. त्यानंतर झालेल्या वादात त्याने आपल्याला रुळांवर ढकलल्याचे तिने सांगितले.

या घटनेमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त करत तिने आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. घरातील अनेक जबाबदाऱ्या आपण सांभाळत होतो, मात्र आता एका हाताने काम करणे कठीण झाल्याचेही तिने सांगितले.

गुन्हा दाखल; कलमे वाढवण्याची मागणी

घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. 6 नोव्हेंबर रोजी भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 117(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, खुनाच्या प्रयत्नाचे कलम 109 लागू न केल्याबद्दल पीडितेच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here