Home एक्सक्ल्युजिव्ह जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

0
जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. ‘सध्या तुम्ही वेगळ्या विषयाबाबत उत्सुक आहात, याची मला कल्पना आहे. मात्र, जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतीलच,’ असे सांगत त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर थेट भाष्य करणे टाळले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला होता. या संभाव्य भेटीमागे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, शरद पवार सध्या कोणालाही भेटणार नसल्याची माहिती समोर आली. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार त्यांची भेट घेण्यासाठी जाणार नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बारामती येथे माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी या घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, सुनेत्रावहिनी या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने त्या जो निर्णय घेतील, तो अजितदादांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान्य असेल. ‘नेत्यांपेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा’ हे अजित पवार यांचे ब्रीद सुनेत्रा पवार यांनी पूर्वीही जपले असून, आजही त्या कार्यकर्त्यांना महत्त्व देत आहेत. पक्षहितासह महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्यास त्या सक्षम आणि खंबीर आहेत, असे मिटकरी यांनी नमूद केले.

https://www.prahaar.in/2026/11/11/sunetra-pawar-reviews-tribal-development-initiatives-special-service-week-seva-saptah-organized-in-pune-and-beed/

दुसरीकडे, अजित पवार गटाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. विलीनीकरणाबाबत माध्यमांमध्ये वारंवार चर्चा होत असली, तरी सध्या तरी अशी कोणतीही चर्चा सुरू असल्याचे आपल्याला दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्यास ती दिवाळीच्या निमित्ताने आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असावी. तसेच, प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार रुग्णालयात असताना त्यांची विचारपूस केली होती. अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलेल्या नेत्यांनी ज्येष्ठ नेत्याची भेट घेणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे या भेटींचा विलीनीकरणाच्या चर्चेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here