Home क्रीडा IND vs NZ: चौथ्या वनडेपूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, शुभमन गिलसह तीन खेळाडू प्लेइंग 11 मधून आउट!

IND vs NZ: चौथ्या वनडेपूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, शुभमन गिलसह तीन खेळाडू प्लेइंग 11 मधून आउट!

0
IND vs NZ: चौथ्या वनडेपूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, शुभमन गिलसह तीन खेळाडू प्लेइंग 11 मधून आउट!
IND vs NZ: चौथ्या वनडेपूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, शुभमन गिलसह तीन खेळाडू प्लेइंग 11 मधून आउट! (Photo: ANI)

भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि न्यूझीलंडची मालिका विजयाची संधी हुकली आहे. तर भारताने उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकला की मालिका खिशात घालेल. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा या चौथ्या वनडे सामन्याकडे लागून आहेत. हा सामना माउंट माउंगानुई येथे खेळला जाणार आहे. पण या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. कारण शेवटच्या दोन वनडे सामन्यात शुभमन गिलसह काही खेळाडू खेळणार नाहीत, हे आधीच स्पष्ट होतं. शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज चौथ्या वनडे सामन्यात खेळणार नाहीत. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर संघाचं नेतृत्व करणार आहे.

गिल, राहुल आणि कंबोजची जागा कोण घेणार?

शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज या तिघांना कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. असं असताना शेवटच्या दोन सामन्यात शुभमन गिलच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. इशान किशन रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरू शकतो. शेवटच्या दोन वनडे सामन्यात इशान किशनकडे उपकर्णधारपदही आहे. त्यामुळे इशान किशन प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने गिलऐवजी इशान किशनला सलामीची संधी द्यावी असं सूचवलं आहे. तर मधल्या फळीत केएल राहुलऐवजी ऋतुराज गायकवाला पसंती दिली आहे. दिनेश कार्तिकही रायु़डूच्या मताशी सहमत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/england-cricket-squad-south-africa-tour-announced-uncapped-player-selected-major-changes-in-team/

दुसरीकडे, अंशुल कंबोजची जागा कोण घेणार? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींना डला आहे. यावरही माजी क्रिकेटपटूंनी तोडगा सूचवला आहे. अंशुल कंबोजच्या जागी यश ठाकुरला संधी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यश ठाकुरला या निमित्ताने एक सामना खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वासही दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here