Home ताज्या घडामोडी Kolkata- Mumbai Flight Threat: कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी, विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क

Kolkata- Mumbai Flight Threat: कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी, विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क

0
Kolkata- Mumbai Flight Threat: कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी, विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क
कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: कोलकाता- मुंबई विमान अपहरणाची धमकी देण्यात आली आहे. एअर इंडिया कंपनीचं हे विमान आहे, या विमानाला हायजॅकची धमकी देण्यात आली आहे. विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. हायजॅकची धमकी मिळाल्यामुळे विमानाची सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी केली जात आहे. हे विमान कोलकात्याहून मुंबईला येत होते. विमान टेक ऑफ घेण्याच्या काही मिनिटांआधीच ही चिठ्ठी सापडल्यामुळे काही काळ कोलकाता विमानतळावरील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

https://www.prahaar.in/2026/11/11/new-vande-bharat-route-big-news-for-vande-bharat-passengers-the-train-will-now-run-on-the-madgaon-yesvantpur-route/

एअर इंडिया कंपनीचं हे विमान होतं. विमान उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये होतं, असं असतानाच ही घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून पार्किंग वे वरून आयसोलेशन वेमध्ये विमान हलवण्यात आलं आहे. आयसोलेशन वेमधून संपूर्ण विमानाची झाडा झडती घेतली जाणार आहे. शिवाय, विमानातील प्रत्येक प्रवाशाची देखील सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. विमान अपहरणाची धमकीची चिठ्ठी मिळाल्यानंतर संपूर्ण विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. आता संपूर्ण चौकशीतून कोणती माहिती समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सध्या सणासुदीनिमित्त मोठ्या प्रमाणावर प्रवासी देशांतर्गत प्रवास करत असतात. सणासुदीच्या दिवसानिमित्त सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. सणासुदीच्या दिवसांमध्येही विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर कोलकात्याहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या विमानामध्ये अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी सापडली आहे आणि ही चिठ्ठी विमान क्रू मेंबरला सापडल्याची माहिती आहे. ह्या चिठ्ठीमध्ये विमान हायजॅक करू (विमानाचे अपहरण करू) असा संदेश देण्यात आला होता. या संदेशामुळे सर्वांचीच धांदळ उडाली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/kedarnath-yatra-concludes-19-22-lakh-pilgrims-offered-prayers-this-year-temple-doors-closed-amidst-chants-of-jai-baba-kedar/

विमान उड्डाण घेण्याआधी काही मिनिटांआधीच ही चिठ्ठी सापडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विमान उड्डाण घेण्याआधी ही अपहरणाची चिठ्ठी सापडल्यामुळे, विमानातील क्रू मेंबरने लगेचच सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. त्यांना माहिती दिल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांकडून पार्किंग वे वरून आयसोलेशन वेमध्ये विमान हलवण्यात आलं आहे. आयसोलेशन वेमध्ये संपूर्ण विमानाची झाडाझडती घेण्यात येईल. या दरम्यान, संपूर्ण प्रवाशांचीही झाडाझडती घेतली जाईल. कारण, विमानामध्ये ज्या प्रवाशाकडे विमानाचे अधिकृत तिकिट असते, त्यालाच प्रवेश मिळतो. नेमकी ही चिठ्ठी कोणी टाकली? याची झाडाझडती सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जात आहे.

विमान अपहरणाची धमकी मिळाल्यामुळे सध्या कोलकाता विमानतळावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुरक्षा यंत्रणेकडून सध्याच्या घडीला संपूर्ण विमानाची आणि विमानातील प्रवाशांची झाडाझडती घेतली जात आहे. आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होतंय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here