Vande Bharat New Route: भारतातील रेल्वेची सर्वात प्रीमियन एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत 15 नोव्हेंबर पासून मडगाव-गोवा वंदे भारत बंद करण्यात येणार आहे. देशी आणि विदेशी पर्यटकांमध्ये एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून गोवा मानले जाते आणि त्यातीलच प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणजे मडगाव. त्यामुळे प्रवाशांची वाढती मागणी पाहता वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मडगाव-गोवा वंदे भारत एक्सप्रेस बंद करण्यात येत आहे.
रेल्वे बोर्डाच्या कोचिंग संचालनालयाने नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस मडगाव आणि यशवंतपूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावेल. या ट्रेनचा क्रमांक 26655/56 असेल. मडगाव येथून सकाळी 8:20 वाजता ही ट्रेन सुटेल. मडगाव पासून कारवार, गोकर्ण रोड, मुरडेश्वर, मुकांबिका रोड, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मंगळूर जंक्शन, काबका पुत्तूर, सुब्रमण्य रोड, सकलेशपूर, हसन आणि श्रवणबेळगोळा या स्थानकांवर ही ट्रेन थांबेल आणि रात्री 9:15 वाजता यशवंतपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन यशवंतपूर येथून सकाळी 7:35 वाजता सुटेल व वर दिलेल्या सर्व स्थानकांवर थांबेल आणि रात्री 8:55 वाजता मडगावला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल. ती बुधवारी यशवंतपूरहून सुटणार नाही, तर गुरुवारी मडगावहून सुटणार नाही.
https://www.prahaar.in/2026/11/11/mixed-audience-reactions-to-the-trailer-for-salman-khans-matrubhumi-major-soiba-maningba-should-have-been-given-more-screen-time/
याच पार्श्वभूमीवर, मडगाव आणि यशवंतपूर दरम्यान नवीन वंदे भारत सेवा सुरू झाल्यावर, मडगाव आणि मंगळूर सेंट्रल दरम्यान धावणारी 20645/46 वंदे भारत एक्सप्रेस बंद करण्यात येईल. दोन्ही गाड्या ह्या एकाच मार्गावर धावतात, त्यामुळे एकाच मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात काही अर्थ नाही. रेल्वे बोर्डाच्या परिपत्रकानुसार, नवीन ट्रेन सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. त्यात सांगितले आहे की, तयारी पूर्ण होताच नवीन ट्रेन सेवेत करण्यात होईल.
रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच 31ऑक्टोबर रोजी वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्लीपर सेवा सुरू केली आहे. डोंगराळ आणि सुरक्षतितेच्या कारणांमुळे ट्रेनचा वेग मर्यादित ठेवण्यात येत असून सरासरी ताशी वेग 55 किमीपेक्षा कमी असून देशातील सर्वात संथ वंदे भारत ट्रेन ठरणार आहे.