Home ताज्या घडामोडी नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल

0
नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल
नवी मुंबईतील गोळीबारात दोन तरुणी जखमी, पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नवी मुंबई: गेल्या आठवड्यामध्ये नवी मुंबईतील कोपर खैराणेमध्ये, दोन सख्ख्या बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये दोघीही बहि‍णी जखमी झालेल्या होत्या. त्यापैकी एक तरूणी किरकोळ जखमी होती आणि एकीच्या पाठीमध्ये बंदुकीची गोळी अडकलेली होती. त्या तरूणीच्या पाठीमध्ये अडकलेली गोळी भायखळ्याच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार करून काढण्यात आली. उपचारानंतर त्या तरूणीची तब्येत सध्या स्थिर आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/a-250-year-old-tradition-a-three-day-festival-and-a-year-long-sojourn-in-the-sea-the-unique-saga-of-the-deity-bahiri-from-the-village-of-diwale/

दरम्यान, गुरूवारी, 5 नोव्हेंबर 2026 रोजी कोपरखैराणेतील सेक्टर 1 मध्ये आरोपी अर्जुन चव्हाणने घराबाहेर बसलेल्या दोन्हीही बहि‍णींवर गोळीबार केल्यानंतर त्यांना लगेचच नवी मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. परंतु, रूग्णालयामध्ये पुरेशी वैद्यकीय यंत्रणा आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयात न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्यामुळे रूग्णालय प्रशासनाने भायखळ्याच्या जे.जे. रूग्णालयामध्ये शिफ्ट करण्यासाठी सांगितले. तिथेच आज त्यातील छोट्या बहिणीवर पाठीत अडकलेली गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/11/06/man-arrested-for-firing-at-ex-partner-her-sister-in-navi-mumbai/

नवी मुंबई महानगर पालिकेच्या रूग्णालयातील फर्स्ट रेफरल युनिट (एफआरयू) चे राजेंद्र म्हात्रे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “अंदाधुंद गोळीबार करताना 20 वर्षीय तरूणीच्या पाठीला गोळी लागली. पाठीला लागलेली गोळी त्या तरूणीच्या पाठीच्या त्वचेच्या अगदी खाली अडकली होती. शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असल्याने आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध नसल्याने, आम्हाला हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे करायचे नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही बहिणींना भायखळ्याच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.” असे म्हात्रे म्हणाले. जे. जे. हॉस्पिटलमध्ये, जनरल सर्जरी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. श्रद्धा अभिजीत ढेंडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने सुमारे 30 मिनिटे चाललेल्या शस्त्रक्रियेत यशस्वीरित्या गोळी काढली.

https://www.prahaar.in/2026/11/06/a-major-decision-by-chief-minister-fadnavis-opportunity-for-children-of-sanitation-workers-to-secure-class-3-government-jobs/

दरम्यान, पीडितेच्या मोठ्या बहिणीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यामध्ये एक्स्ट्राड्यूरल आणि सबड्यूरल हेमेटोमाचे निदान झाले आहे. दोन्ही बहिणींची प्रकृती सध्या स्थिर असून त्या रुग्णालयात दाखल आहेत. काही मिडिया रिपोर्टनुसार, प्रेम प्रकरणामुळे तरूणींवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.गुरूवारी, 5 नोव्हेंबर 2026 रोजी कोपरखैराणेच्या सेक्टर 1 मध्ये घराच्या बाहेर रात्री उशिरा दोन्हीही बहिणी बसलेल्या होत्या. घराच्या बाहेर असलेल्या अंगणामध्ये बसलेल्या असताना 20 वर्षीय तरूणीच्या एक्स बॉयफ्रेंडने अंदाधुंद गोळीबार केला आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव अर्जुन चव्हाण (22) असं आहे.

DCP (Zone 1) विजय खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपी अर्जुन चव्हाणचे जखमी असलेल्या दोन्हीही बहि‍णींपैकी एका बहिणीचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्या दोघांचेही पूर्वी प्रेमसंबंध होते. ब्रेकअप झाल्याच्या रागामध्ये आरोपीने हा गुन्हा केला आहे. आरोपीची बंदूक आणि आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here