Home क्रीडा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर!

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर!

0
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर!
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा तडाखा! Syed Mushtaq Ali Trophy 2026 साठी ‘डेंजरस’ संघ जाहीर! फोटो सौजन्य: ANI News

मुंबई: क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026’ (Syed Mushtaq Ali Trophy 2026) या अत्यंत रोमांचक देशांतर्गत T-20 स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) सोमवारी 16 सदस्यीय टीम जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व भारताचा T-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. ह्या क्रिकेट सामन्याला येत्या 14 नोव्हेंबरपासून कोलकात्यामध्ये सुरूवात होणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/indw-vs-saw-indian-womens-team-announced-two-major-changes-made-to-the-squad-for-the-south-africa-tour/

मुंबईच्या या नव्या संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेला आणि देशांतर्गत क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे, धडाकेबाज फलंदाज सरफराज खान, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांसारखे मॅचविनर खेळाडू या संघात खेळताना दिसणार आहेत. याशिवाय विकेट किपरची जबाबदारी, अंगकृष्ण रघुवंशी आणि हार्दिक तामोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. निवड समितीचे प्रमुख राजेश पवार यांच्याकडून ह्या सर्व धडाकेबाज खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/when-where-and-how-to-watch-the-third-india-vs-new-zealand-odi-get-all-the-details/

असा आहे मुंबईचा संपूर्ण स्क्वॉड

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अंगकृष्ण रघुवंशी (विकेट किपर), हार्दिक तामोरे (विकेट किपर), दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर, मुशीर खान, सरफराज खान, साईराज पाटील, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलानी, मॅक्सवेल स्वामीनाथन, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी आणि सिल्वेस्टर डिसोझा अशा 14 जणांची ही संपूर्ण टीम असणार आहे. गेल्या सीझनप्रमाणे, यंदाच्या सीझनमध्येही मुंबईचा संघ विजेतेपदावर आपले नाव कोरण्यासाठी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली हा संघ कशापद्धतीने आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांचेच लक्ष वेधतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोलकात्यामध्ये होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here