Home दीपावली Diwali 2026: दिवाळी पाडव्याला पतीचे औक्षण कधी करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचा संपूर्ण विधी

Diwali 2026: दिवाळी पाडव्याला पतीचे औक्षण कधी करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचा संपूर्ण विधी

0
Diwali 2026: दिवाळी पाडव्याला पतीचे औक्षण कधी करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचा संपूर्ण विधी
AI Generated image

दिवाळीतील आनंदाचा आणि मंगल दिवस म्हणजे बलिप्रतिपदा, अर्थात दिवाळी पाडवा. यंदा हा सण मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी पत्नी पतीला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. व्यापारी वर्गासाठीही हा दिवस नवीन सुरुवातीचा मानला जातो. अनेक ठिकाणी नवविवाहित जोडप्यांचा पहिला पाडवा विशेष आनंदात साजरा केला जातो.

पाडव्याचा मुहूर्त

पंचांगानुसार कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा सूर्योदय १० नोव्हेंबर रोजी होत असल्याने याच दिवशी पाडवा साजरा केला जाईल. प्रतिपदा तिथी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होऊन १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राहणार आहे. औक्षणासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते. शुभ चौघडिया मुहूर्त सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत औक्षण करणे सर्वात योग्य मानले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/08/change-your-gifting-trend-this-diwali-take-a-look-at-some-fantastic-smart-gadget-options/

धार्मिक महत्त्व काय?

बलिप्रतिपदेचा संबंध भगवान विष्णूच्या वामन अवताराशी आणि दानशूर राजा बळीशी जोडला जातो. कथेनुसार, वामनाने राजा बळीकडे तीन पावले जमीन दान मागितली. दोन पावलांत पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बळीने स्वतःचे मस्तक पुढे केले. त्याच्या दानावर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले आणि वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याचा वर दिला. म्हणून या दिवशी बळीराजाचे पूजन केले जाते.

https://www.prahaar.in/2026/11/07/create-beautiful-and-unique-photos-for-diwali-with-the-help-of-ai-just-copy-these-6-special-prompts/

औक्षण कसे करावे?

या दिवशी घर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते. पतीला आसनावर बसवून कपाळावर कुंकवाचा टिळा लावला जातो. औक्षणाच्या ताटात निरांजन, अक्षता, हळद-कुंकू, फुले आणि मिठाई ठेवली जाते. निरांजनाने ओवाळून अक्षता लावल्या जातात. त्यानंतर पती पत्नीला भेटवस्तू देतो. ही परंपरा केवळ विधी नसून प्रेम, आदर आणि एकमेकांप्रती असलेल्या विश्वासाचे प्रतीक मानली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here