भारतीय महिला संघ स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आणखी एका मालिकेसाठी सज्ज झाला आहे. नुकतंच स्मृती मंधानाच्या नेतृत्वात झिम्बाब्वे संघाला धोबीपछाड दिला होता. आता दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार असून स्मृती मंधानाच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ तीन टी20, तीन वनडे आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. या तिन्ही फॉर्मेटसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या तिन्ही फॉर्मेटमध्ये दुखापतीतून सावरलेल्या जेमिमा रॉड्रिग्सची एन्ट्री झाली आहे. द हंड्रेड स्पर्धेत जेमिमाला दुखापत झाली होती. त्यामुळे टी20 आशिया कप स्पर्धेला मुकली होती. तसेच झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेतही खेळू शकली नाही. आता तिचं संघात पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे, अमनजोत कौर हिचीही संघात एन्ट्री झाली आहे. टी20 संघात तिची निवड झाली आहे.
भारताचा दक्षिण अफ्रिकेत चांगला रेकॉर्ड
भारतीय महिला संघाची दक्षिण अफ्रिकेतील आजवरची कामगिरी चांगलीआहे. भारतीय महिला संघाने शेवटची वनडे मालिका 2018 मध्ये खेळली होती. त्या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता. भारताने दक्षिण अफ्रिकेत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी सहा सामन्यात विजय आणि 4 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित ठरला आहे. पण टी20 मालिकेत भारताला मोठा पराभव सहन करावा लागला आहे. भारताने टी20 मालिका 1-4 ने गमावली होती. तर 2002 नंतर भारतीय पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेत कसोटी खेळणार आहेत. 2002 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला होता.
भारत-दक्षिण अफ्रिका मालिका वेळापत्रक
-
- एकमेव कसोटी, 9 डिसेंबर, सेंट जॉर्ज पार्क
- पहिला वनडे, 16 डिसेंबर, पर्ल
- दुसरा वनडे, 19 डिसेंबर, केप टाउन
- तिसरा वनडे, 22 डिसेंबर, ब्लोमफोंटेन
- पहिला टी20, 26 डिसेंबर, बेनोनी
- दुसरा टी20, 29 डिसेंबर, पोटचेफस्ट्रूम
- तिसरा टी20, 30 डिसेंबर, पोटचेफस्ट्रूम
🚨 News 🚨
#TeamIndia squads announced for all-format tour of South Africa 📝 👉
Smriti Mandhana takes charge as full-time Test captain 🙌
Details ▶️ https://t.co/L5jiMKSphi
#SAvIND https://t.co/67NvBjQGiH
— BCCI Women (@BCCIWomen) November 9, 2026
https://www.prahaar.in/2026/11/09/when-where-and-how-to-watch-the-third-india-vs-new-zealand-odi-get-all-the-details/
दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ
कसोटीसाठी भारतीय संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतीका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, ऋचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ति शर्मा (उप-कर्णधार), श्री चरणी, स्नेह राना, क्रांति गौड, नंदनी शर्मा, जिंतिमणि कलिता, सायली सतघरे
वनडेसाठी भारतीय संघ: स्मृति मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतीका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, ऋचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ति शर्मा (उप-कर्णधार), श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांति गौड, नंदनी शर्मा, जिंतिमणि कलिता, सायली सतघरे
टी20साठी भारतीय संघ: स्मृति मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा (उप-कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, रिचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), अनुष्का शर्मा, दीप्ति शर्मा, श्री चरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांति गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी, सायली सतघरे.