Home ब्रेकिंग न्यूज Sameer Wankhede Wife Kranti Redkar : पती समीर वानखेडेंच्या कारकिर्दीमुळे बॉलिवूडचे दरवाजे बंद ? क्रांती रेडकरचा खळबळजनक खुलासा!

Sameer Wankhede Wife Kranti Redkar : पती समीर वानखेडेंच्या कारकिर्दीमुळे बॉलिवूडचे दरवाजे बंद ? क्रांती रेडकरचा खळबळजनक खुलासा!

0
Sameer Wankhede Wife Kranti Redkar : पती समीर वानखेडेंच्या कारकिर्दीमुळे बॉलिवूडचे दरवाजे बंद ? क्रांती रेडकरचा खळबळजनक खुलासा!

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या तिच्या नव्या ‘मैत्रेया’ (Maitreya) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. क्रांतीने स्वतः या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, मैत्री आणि प्रेमाच्या सीमारेषेवरील नाजूक नात्यांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या चित्रपटाच्या शानदार ट्रेलर लाँच सोहळ्यात तिचे पती आणि वरिष्ठ आयआरएस (IRS) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या जुळ्या मुलींसह सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर एका विशेष मुलाखतीत क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक अनुभव मांडले. याच संवादादरम्यान क्रांतीने हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या कटू अनुभवांना वाट मोकळी करून दिली.

बॉलिवूडमधून नाकारल्याचा अनुभव

पती समीर वानखेडे यांच्या कामाच्या पद्धतीचा आणि त्यांच्या नावाचा फटका स्वतःच्या अभिनयाच्या व दिग्दर्शनाच्या करिअरला बसला आहे का? असा प्रश्न विचारला असता, क्रांतीने कोणतीही पडदा न ठेवता मोकळेपणाने उत्तर दिले. क्रांती म्हणाली की, “हो, हिंदी चित्रपटसृष्टीत मला काम देणं टाळलं जातं. मग ते दिग्दर्शन असो वा लिखाण, तिथल्या मोठ्या स्टुडिओंना माझ्यासोबत काम करण्याची इच्छा नसते. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.” तिने एका प्रसंगाचा उल्लेख करताना सांगितले की, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने क्रांतीच्या कामाचे कौतुक करत तिचे नाव अनेक हिंदी स्टुडिओंकडे सुचवले होते. मात्र, तिथून थेट नकार आला. “ज्या प्रोजेक्टमध्ये समीर वानखेडे यांचे नाव जोडले जाईल किंवा त्यांच्याशी संबंध असेल, अशा प्रोजेक्टचा भाग आम्हाला व्हायचे नाही,” असे स्पष्ट उत्तर त्या स्टुडिओंकडून देण्यात आल्याचे क्रांतीने नमूद केले.

https://www.prahaar.in/2026/11/09/mp-narayan-rane-minister-nitesh-rane-unveil-prahaar-newsline-youtube-silver-play-button-praise-digital-team/

मराठी सिनेसृष्टीचा पाठिंबा आणि प्रेक्षकांचे प्रेम

हिंदी सिनेसृष्टीत नकाराचा सामना करावा लागला असला, तरी क्रांतीने मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी प्रेक्षकांबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली आहे. “हिंदीत जरी त्रास झाला, तरी मराठी सिनेसृष्टीत माझे स्वतःचे हक्काचे लोक आहेत. मराठीत काम करताना इथल्या वाहनांना किंवा सहकलाकारांना या सगळ्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. मराठी प्रेक्षक, कलाकार आणि इथली इंडस्ट्री ज्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, त्याचा मला मनापासून अभिमान वाटतो,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे बॉलिवूडच्या या भूमिकेमुळे वाद पेटला असला, तरी दुसरीकडे मराठी सिनेसृष्टीतील तिच्या या नव्या वाटचालीला प्रेक्षक आणि सहकलाकारांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here