Home ब्रेकिंग न्यूज जेन्सन हुआंग यांच्याभोवती हेरगिरीचा संशय; चीनने आरोप फेटाळले, तंत्रज्ञान जगतात खळबळ

जेन्सन हुआंग यांच्याभोवती हेरगिरीचा संशय; चीनने आरोप फेटाळले, तंत्रज्ञान जगतात खळबळ

0
जेन्सन हुआंग यांच्याभोवती हेरगिरीचा संशय; चीनने आरोप फेटाळले, तंत्रज्ञान जगतात खळबळ

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज जेन्सन हुआंग यांच्यावर हेरगिरी होत असल्याच्या वृत्तांनी कॉर्पोरेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. हे केवळ दोन कंपन्यांनी एकमेकांवर हेरगिरी केल्याचे प्रकरण नाही, तर हा दोन देशांमधील तंत्रज्ञानाची चोरी आणि व्यावसायिक वर्चस्वाचा मुद्दा आहे. तथापि, एलिस हुआंग चिनी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचे चीनने नाकारले आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे दावे पूर्णपणे निराधार आणि चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

या वादाच्या केंद्रस्थानी आहे एलिस हुआंग नावाची एक चिनी व्यावसायिक महिला. एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्याशी तिचे कोणतेही कौटुंबिक संबंध असल्याचे वृत्त नाही. हुआंग या सिंगापूरस्थित मेगास्पीड या कंपनीच्या माजी कार्यकारी अधिकारी आहे, ज्या कंपनीने एनव्हिडियाकडून एआय चिप्स खरेदी केल्या होत्या. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना संशय होता की एलिस हुआंग ही चीनची मुख्य गुप्तचर संस्था असलेल्या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’ साठी काम करत होती. अमेरिकी अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, एलिस हुआंग चीनला एनव्हिडियाच्या तंत्रज्ञान आणि व्यावसायिक घडामोडींविषयी संवेदनशील माहिती पुरवत होती. अमेरिकेच्या निर्यात निर्बंधांना बगल देऊन चीनला प्रगत एआय चिप्स मिळवण्यात मदत केल्याच्या आरोपांखाली मेगस्पीडचीही चौकशी सुरु आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/chief-minister-yogi-adityanath-holds-janata-darshan-in-gorakhpur-issues-directives-for-sensitive-handling-of-citizens-grievances/

या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा जेन्सन हुआंगने एनव्हिडियाच्या संचालक मंडळासमोर एलिस हुआंगसोबत आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्याची कबुली दिली. त्यांनी आपल्या पत्नीचा विश्वासघात केल्याचेही कबूल केले. ८ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात त्याने लिहिले की, त्याच्या वागण्यामुळे त्याच्या पत्नीला आणि मुलांना दुखावले गेले असून त्यासाठी कोणतीही सबब नाही. त्याने आपल्या चुकीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. जरी जेन्सन हुआंगने सार्वजनिकरित्या हे मान्य केले नसले तरी त्याला माहित होते की एलिस हुआंग कथितपणे चिनी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होती.

https://www.prahaar.in/2026/11/09/jharkhand-horrific-road-accident-5-killed-14-injured-truck-hits-funeral-party-van-hazaribag/

चीनने काय निवेदन केले?

चीनच्या परराष्ट्रीय मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, तथाकथित चिनी हेरगिरीच्या आरोप निराधार असून चीनला बदनाम करण्यासाठी चालवलेल्या प्रचार मोहिमेपलीकडे काहीही नाही. यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी गुओ जियाकुन यांनी देखील जेन्सन हुआंग यांना लक्ष्य करणाऱ्या कथित चिनी गुप्तहेर मोहिमेच्या बातम्यांना निराधार असल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here