Home एक्सक्ल्युजिव्ह खा. नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘प्रहार न्यूजलाईन’च्या सिल्व्हर बटनचे अनावरण! डिजिटल टीमचे कौतुक

खा. नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘प्रहार न्यूजलाईन’च्या सिल्व्हर बटनचे अनावरण! डिजिटल टीमचे कौतुक

0
खा. नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘प्रहार न्यूजलाईन’च्या सिल्व्हर बटनचे अनावरण! डिजिटल टीमचे कौतुक
खा. नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘प्रहार न्यूजलाईन’च्या सिल्व्हर बटनचे अनावरण (Photo: Prahaar)

मुंबई : डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘प्रहार न्यूजलाईन’ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, युट्यूबकडून चॅनेलला सिल्व्हर बटन प्राप्त झाले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक नारायण राणे आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा दैनिक ‘प्रहार’चे संचालक नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी (9 नोव्हेंबर) सिल्व्हर बटनचे अनावरण करण्यात आले. या वेळी त्यांनी संपूर्ण डिजिटल टीमचे अभिनंदन करून, यापुढे गोल्डन बटन मिळविण्याचे लक्ष्य ठेवून अधिक मेहनत घेण्याची सूचना केली.

‘प्रहार न्यूजलाईन’च्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक आणि मनोरंजनविषयक घडामोडींची मांडणी केली जाते. बातम्यांसोबतच बुलेटिन, विषयांचा सविस्तर वेध घेणारे एक्सप्लेनर व्हिडीओ, ताज्या घडामोडींचे अपडेट्स, शॉर्ट्स, डॉक्युमेंटरीज, आणि थेट प्रक्षेपण अशा विविध प्रकारच्या आशयातून प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवली जाते. युट्यूबबरोबरच इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या समाजमाध्यमांवरही ‘प्रहार न्यूजलाईन’ सक्रिय आहे.

सिल्व्हर बटनचे अनावरण केल्यानंतर खा. नारायण राणे यांनी या यशाबद्दल डिजिटल टीमचे विशेष कौतुक केले. चॅनेलने गाठलेला हा टप्पा कौतुकास्पद असून, आता गोल्डन बटन मिळविण्यासाठी टीमने अधिक जोमाने काम करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या यशाचा आनंदोत्सवही यावेळी साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा दैनिक ‘प्रहार’चे संचालक नितेश राणे यांनीही डिजिटल टीमचे अभिनंदन केले. ‘प्रहार न्यूजलाईन’ने या टप्प्यापर्यंत मजल मारणे ही अभिनंदनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी दैनिक ‘प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, महाव्यवस्थापक मनीष राणे आणि लेखा व प्रशासन विभागप्रमुख ज्ञानेश सावंत यांची विशेष उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here