

2 चमचे कच्चे दूध, 1 चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर, अर्धा चमचा मध, गरजेनुसार गुलाबपाणी

सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात कच्चे दूध घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि ज्येष्ठमध पावडर घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्यात थोडा मध घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करा. आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट फार पातळ किंवा घट्ट नसावी. अशा प्रकारे तुमचा घरगुती फेसपॅक तयार होईल.

फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा. साधारण 15 ते 20 मिनिटे ती राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. शेवटी त्वचेला अनुकूल असलेले मॉइश्चरायझर लावा. तांदळाच्या पिठाचा थर काढताना चेहरा जोरात घासू नका.
