Home एक्सक्ल्युजिव्ह बोरिवली-कांदिवलीकरांचा प्रवास होणार आरामदायी! BEST ची नवी वातानुकूलित बससेवा सुरू

बोरिवली-कांदिवलीकरांचा प्रवास होणार आरामदायी! BEST ची नवी वातानुकूलित बससेवा सुरू

0
बोरिवली-कांदिवलीकरांचा प्रवास होणार आरामदायी! BEST ची नवी वातानुकूलित बससेवा सुरू

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने सोमवारी (09 नोव्हेंबर) बोरिवली रेल्वे स्टेशन पासून एक नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस मार्ग सुरु केला आहे. हा मार्ग बोरिवली आणि कांदिवली परिसरातील प्रमुख निवासी भागांना जोडेल. ए-636 हा मार्ग गौतम नगर, अनिता नगर आणि अलिका नगर यांसारख्या महत्त्वाच्या निवासी भागांमधून जाईल, त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. या मार्गावर येणाऱ्या इतर प्रमुख ठिकाणांमध्ये समता नगर, ओंकारेश्वर मंदिर आणि ठाकूर कॉलेजचा समावेश आहे.

ए – 636 मार्गाचे वेळापत्रक

बेस्ट उपक्रमाने प्रभाग 27 च्या नगरसेविका नीलम गुरव यांना पाठवलेल्या पत्रानुसार ए-636 बस दररोज 17 ते 20 मिनिटांच्या अंतराने धावे. पहिली बस बोरिवली स्टेशन (पूर्व) येथून सकाळी 6.40 वाजता सुटेल आणि शेवटची बस रात्री 10 वाजता सुटेल, असे बेस्ट उपक्रमाने सांगितले. दाट लोकवस्तीच्या निवासी भागांमधील कनेक्टिव्हीटीमधील उणीव भरून काढण्याच्या आणि खाजगी वाहतुकीला एक आरामदायी पर्याय उपलत करून देण्याच्या उद्देशाने हा नवीन वातानुकूलित मार्ग सुरु करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/a-horrific-incident-occurred-while-bursting-firecrackers-with-friends-a-rocket-pierced-a-minor-boys-abdomen-and/

बोरीवली स्थानक (पूर्व) आणि क्रांती नगर दरम्यान गौतम नगर, अनिता नगर व अलिका नगर मार्ग नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र ए-636 सोमवार, दि.09 नोव्हेंबर 2026 पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. सदर वर्तुळाकार बसमार्गाचा प्रवासमार्ग बोरीवली स्थानक (पूर्व) बोरीवली रेल्वे कंपाऊंड मार्ग – महात्मा गांधी मार्ग, ओंकारेश्वर मंदीर, सर अलियावर जंग महामार्ग, समता नगर जंक्शन, समतानगर, ठाकुर महाविद्यालय, 120 फुट मार्ग, आकुर्ली मार्ग, गौतम नगर, अलिका नगर, क्रांती नगर, आकुर्ली मार्ग, 120 फुट मार्ग, ठाकुर महाविद्यालय समतानगर, समता नगर जंक्शन, सर अलियावर जंग महामार्ग, ओंकारेश्वर मंदीर -कार्टर मार्ग बोरीवली स्थानक (पूर्व) असा आहे. हा मार्ग संपूर्ण आठवडा कार्यान्वित असून या बसमार्गावर 17 ते 20 मिनीटांच्या वेळेने बसगाड्या प्रवर्तित करण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here