प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ काव्या मारन यांच्या शाही विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरु झाली आहे. वृत्तानुसार, या जोडप्याचा विवाहसोहळा १० आणि ११ नोव्हेंबर रोही ग्रीसमध्ये खाजगीरित्या पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी व्हीआयपी पाहुण्यांचे आगमन आधीच सुरु झाले आहे. चित्रपट, राजकारण आणि उद्योग जगतातील अनेक प्रमुख व्यक्ती या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार राजनीकांतही आपल्या कुटुंबासह ग्रीसला रवाना झाले आहेत. थलायवाचे विमानतळावरील फोटो समोर आले आहेत.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनदेखील विमानतळावर दिसले. स्टॅलिन विमानतळावर प्रवेश करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. उदयनिधी देखील आपल्या कुटुंबासह दिसले. रजनीकांत त्यांची मुलगी सौंदर्यासोबत दिसले. चाहत्यांना पाहून रजनीकांत यांनी हात जोडले. विमानतळावर थलायवा यांचा लूक साधा जोतं. त्यांच्या साधेपणाने चाहत्यांना प्रभावित केले. रजनीकांत यांचा आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यात ते विमानात एका चाहत्यासोबत पोज देत आहेत. या फोटो आणि व्हिडिओंमुळे काव्या आणि अनिरुद्धच्या लग्नाबद्दल चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. व्हीआयपी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे हे लग्न या वर्षातील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक ठरणार आहे. रिसेप्शन लग्नापेक्षाही अधिक भव्य असेल. राजकीय, क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/10/27/anirudh-and-kavya-maran-to-tie-the-knot-in-november-wedding-invitation-catches-the-attention-of-netizens/
वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, अनिरुद्ध आणि काव्या येत्या ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत. अनिरुद्ध रविचंद्रकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा संगीत दिग्दर्शक आहे. त्याने ‘लियो’, ‘इंडियन २’, ‘वेट्टैयान’, ‘विदा मुयची’ आणि ‘कुली’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना संगीत दिले आहे. दुसरीकडे, काव्या मारन या सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांच्या सुकन्या असून, त्या सन टीव्ही नेटवर्कच्या कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून जबाबदारी सांभाळतात. तसेच, क्रिकेट जगतात त्या आयपीएलमधील ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH) संघाच्या मालक म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत.