दिल्ली : दिवाळीचा सण एका कुटुंबासाठी दुःखद ठरला आहे. दिल्लीतील नरेला परिसरात फटाके फोडताना रॉकेट पोटात लागल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला.
https://www.prahaar.in/2026/11/09/another-major-incident-in-mumbai-a-fire-breaks-out-in-a-flat-on-the-7th-floor-of-hans-vallabh-building-in-andheri/
फटाके फोडताना रॉकेट मुलाच्या पोटात लागले
ही घटना बाह्य दिल्लीतील नरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव कॉलनीमध्ये घडली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवाळीची पूजा झाल्यानंतर घरातील सदस्य फटाके फोडत होते. यावेळी एक लहान मुलगा रॉकेट उडवत होता. मात्र, रॉकेट आकाशात जाण्याऐवजी थेट मुलाच्या पोटाला लागले. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला.
Delhi | A 10-year-old child died after a firecracker burst in his hand in Narela area. The child was rushed to the hospital but died during treatment: Delhi Police
— ANI (@ANI) November 9, 2026
रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
घटनेनंतर कुटुंबीयांनी मुलाला तातडीने नरेला येथील राजा हरिश्चंद्र रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रुग्णालयातील उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मुलाच्या वडिलांचीही प्रकृती खालावली
मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या वडिलांची प्रकृतीही खालावल्याचे वृत्त आहे. दिवाळीच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रुग्णालयावरील निष्काळजीपणाच्या आरोपांसह संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.