Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची उघडीप; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील 5 दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची उघडीप; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील 5 दिवस हवामान कोरडे

0
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची उघडीप; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील 5 दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather News: राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता हवामानात बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, तापमानात हळूहळू घट होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका, तर रात्री हवेत गारवा असे संमिश्र वातावरण महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/massive-fire-breaks-out-at-midnight-in-the-noor-bagh-area-of-dongri-shops-and-several-shanties-suffer-extensive-damage/

पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता कमी

कोकणासह राज्यातील बहुतांश भागांत थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या राज्यात कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात दिवसा उष्णता, रात्री थंडी

धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव परिसरात सकाळी तुलनेने उष्ण, तर रात्री थंड वातावरण जाणवत आहे. या भागात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

पुण्यात तापमानात घट होण्याची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह परिसरात कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. हवेत काही प्रमाणात आर्द्रता असली तरी रात्री तापमान कमी होत असल्याने गारवा जाणवू लागला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही कोरडे हवामान

मराठवाड्यात कमाल तापमान 33 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवस या भागात कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, विदर्भातही पावसाने उघडीप दिली असून थंडीची चाहूल लागली आहे. या भागात कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अलर्ट नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

एकूणच, दिवाळीच्या काळात राज्यात दिवसा उष्णता आणि रात्री गारवा असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसापासून दिलासा मिळणार असला, तरी तापमानातील बदल जाणवत राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here