Bank Holiday: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँकांना कधी न कुठपर्यंत सुट्टी असणार आहे. सोमवारी नोव्हेंबर महिन्याचा नवा आठवडा सुरु होत आहे. पण या या आठवड्यात 6 दिवस सुट्टी असणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ते एचडीएफसी बँकेसह सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील. तुमच्या भागात बँका नेमक्या कधी राहतील बंद? हे जाणून घ्या.
उद्या सोमवारी अर्थात 9 नोव्हेंबर रोजी जर तुम्ही बँकेत काही कामानिमित्ताने जाणार असाल तर उद्या देशात अनेक ठिकाणी बँकांना सुट्टी असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत सुट्टीच्या कॅलेंडरप्रमाणे, दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजा यांसारख्या शुभ सणांच्या पार्श्वभूमीवर, ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ (Negotiable Instruments Act) अंतर्गत रिझर्व्ह बँकेने 9 नोव्हेंबर रोजी बँकांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. नेमकी ही सुट्टी कोणत्या राज्यांना असणार आहे ते पाहूया.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले आहे. एक म्हणजे ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ तर दुसरं म्हणजे ‘रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट’ आणि तिसरं म्हणजे ‘खाती बंद करण्याचे’ (accounts closing) दिवस. अश्या अंतर्गत सुट्ट्या असतात. यानुसार ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट’ अंतर्गत दिवाळी, गोवर्धन पूजा आणि विश्वकर्मा दिनानिमित्त ९ नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोणत्या राज्यात बँका बंद?
सोमवारी, 9 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, कानपूर, राजस्थान येथे जयपूर, मध्य प्रदेश मधून भोपाळ, चंदीगड, त्रिपुरामधील अगरतळा, सिक्कीम येथून गंगटोक, तर मणिपूरमधून इम्फाळ या ठिकाणच्या बँका बंद असतील.
कुठे असणार बँका सुरु?
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये 9 नोव्हेंबर रोजी बँकिंग सेवा सुरू असणार आहेत. पण या ठिकाणी 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी बळी प्रतिपदा आणि भाऊबीज या दिवशी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुमच्या कामांचं नियोजन आधीच करून घ्या.
तर 13 नोव्हेंबर शुक्रवारी वांगला उत्सवनिमित्त मेघालयातील स्थानिक सुट्टीमुळे फक्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील, परंतु देशभरातील बँका सुरू राहतील. त्यांनतर, आरबीआयच्या नियमांनुसार, महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद राहतील. तर 15 तारखेला साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
सुट्टीच्या दिवशी कसा करणार व्यवहार
जरी बँकेच्या शाखा बंद असल्या तरी, ग्राहकांना आता डिजिटल बँकिंग सेवा वापरताना कोणतीही अडचण येणार नाही. UPI सेवा म्हणजेच PhonePe, Google Pay, Paytm आणि बँकांच्या स्वतःचे UPI ॲप्स हे सुरुच राहणार आहेत. याशिवाय इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सेवाही सुरु असणार आहेत. तसेच तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर ATM सेवा देखील सुरु आहे. याशिवाय, कॅश डिपॉझिट मशिन (CDM) द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहील.