जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2026 च्या सुरुवातीला सोन्याचे दर खूप वाढलेले पहायला मिळाले. मात्र, त्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. जानेवारीतील विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर जवळपास 25 टक्क्यांनी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत आता सोन्याचे दर आणखी घसरणार की पुन्हा तेजी अनुभवायला मिळणार, असा प्रश्न असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याचदरम्यान वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) आपल्या ताज्या अहवालातून सोन्याच्या किमतींबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.(Gold Price Drop0)
सोन्याच्या दरात 25 टक्क्यांची घसरण..
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, जानेवारी 2026 मध्ये सोन्याने प्रति अंश 5,405 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सोन्याचा भाव 3,913 डॉलर प्रति अंशवर बंद झाला. म्हणजेच विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत जवळपास 25 टक्क्यांची घसरण झाली आहे.ऑक्टोबर महिन्यातच सोन्याच्या किमतीत 6.3 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, ही घसरण केवळ एका देशापुरती मर्यादित नव्हती, तर अनेक प्रमुख चलनांमध्ये सोन्याच्या किमती खाली आल्या.
https://www.prahaar.in/2026/11/08/pm-modi-greets-bharat-ratna-lk-advani-on-100th-birthday-lauds-journey-from-scratch/
आता सोन्याचे दर आणखी घसरणार का?
सोन्याच्या किमतीत झालेली ही घसरण दीर्घकाळ चालणाऱ्या मंदीची सुरुवात असेलच, असे नाही, असे कौन्सिलच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता सोन्याचा भाव तात्पुरत्या तळाजवळ पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. कौन्सिलच्या मते, सोन्याच्या किमतीत पुन्हा सुधारणा होण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन ऐतिहासिक परिस्थितींपैकी दोन परिस्थिती सध्या अनुकूल आहेत. त्यामुळे सध्याची घसरण ही मोठ्या मंदीपेक्षा बाजारातील सुधारणा असण्याची शक्यता अधिक आहे.(Gold Price Prediction)
https://www.prahaar.in/2026/11/08/president-droupadi-murmu-pm-narendra-modi-and-top-leaders-extend-diwali-wishes-pray-for-peace-prosperity/
सोन्याच्या दरावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होणार?
सोन्याच्या किमतीवर अनेक जागतिक आर्थिक घटकांचा परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश आहे. अमेरिकन डॉलरची स्थिती: डॉलर मजबूत झाल्यास सोन्यावर दबाव निर्माण होऊ शकतो. व्याजदर वाढल्यास सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण कमी होण्याची शक्यता असते. महागाई वाढल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढू शकते. युद्ध, संघर्ष आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. जगभरातील केंद्रीय बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी किमतींना आधार देऊ शकते.(Gold Market Trends)
केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी कायम
सोन्याच्या बाजारासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय बँकांकडून होणारी खरेदी. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 3 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2026 मध्ये केंद्रीय बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी 2025 मधील पातळीइतकी किंवा त्याहून अधिक राहण्याची अपेक्षा आहे.तिसऱ्या तिमाहीत केंद्रीय बँकांनी 321 टन सोन्याची खरेदी केली. मागील तिमाहीच्या तुलनेत ही खरेदी 42 टक्क्यांनी अधिक होती.(Gold Price Crash)