Home महाराष्ट्र ठाणे Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या

0
Thane News: मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या
मुंब्रातील धक्कादायक घटना, नवजात बाळाची अडीच लाखांमध्ये विक्री; पोलिसांनी होमगार्डसह 10 जणांना ठोकल्या बेड्या फोटो सौजन्य: सोशल मीडिया

ठाणे: ठाण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुंब्रा परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी अवघ्या 20 दिवसांच्या बाळांची पैशांसाठी विक्री करण्याची घटना घडली आहे. ठाणे शहरातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या घटनेची सर्वच स्तरामध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आहे. एका टोळीने बाळाच्या जन्मदात्या आई- वडिलांना लक्ष करत तिच्याकडून बाळ ताब्यात घेऊन त्यानंतर त्याची विक्री केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. ठाणे पोलिसांनी आरोपींना अटक केली असून 20 दिवसांच्या बाळाला त्याच्या आई- वडिलांकडे सुपूर्त केलेले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/07/thane-masunda-lake-suicide-attempt-32-year-old-woman-jumps-shocking-rescue-incident/

ठाणे पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील (Zone 1) यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंब्रामध्ये 20 दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलं असून त्या बाळाची सुखरूप सुटका केली आहे. नवजात बाळाची विक्री करणाऱ्या नेटवर्कमध्ये, एका होमगार्ड जवानासह इतरत्र 10 जणांना अटक केली आहे. मुंब्रा पोलीसांनी घटनेची मिळताच बाळाची चौकशी करण्यास सुरूवात केली. 24 तासाच्या आतच पोलिसांनी 20 दिवसांच्या बाळाची सुखरूप सुटका केली. शुक्रवारी मुंब्रा पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. “

 

मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ भीक मागून पोटाची खळगी भरणारी 19 वर्षीय तक्रारदार अनिसा रफीक शेख यांना, रेहान रिझवान शेख (22) नावाच्या आरोपीने त्यांचा लहान मुलगा अडीच लाख रुपयांना विकण्यास भाग पाडले. रेहानने सुरुवातीला अनिसाला 1.20 लाख रुपये दिले होते. पण, नंतर त्याने आणि त्याच्या साथीदाराने अनिसा आणि तिच्या बहिणीला मारहाण करून जबरदस्तीने ते सर्व पैसे परत घेतल्याची माहिती तक्रारदार महिलेने मुंब्रा पोलिसांना दिली. घटनेबद्दल संपूर्ण माहिती कळताच मुंब्रा पोलिसांनी लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी आणि चिमुकल्याची सुटका करण्यासाठी एक पोलीस पथक तयार करण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/11/07/thane-fire-breaks-out-in-a-locked-unit-within-a-dilapidated-building-in-uthalsar/

मुंब्रा पोलिसांनी 5 नोव्हेंबर रोजी घटनेची तक्रार नोंदवून घेतली. 24 तासांच्या आतच पोलिसांनी ठाण्यातून ज्योती नरेश पाटील (35), रेहान रिजवान शेख (22), फरहान उर्फ ​​फेराऊ रेहान शेख (21), फरीदा अकबर सय्यद (52), हुर्ना अलियास ​​हुस्ना अल्ताफ शेख (27), अनिता गोपीनाथ धोत्रे (42) आणि सुनितार खान (42) या सात संशयितांना अटक केली आहे. या सर्व आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांचं पथक पुढील तपासासाठी जालना जिल्ह्यात पोहोचले, जिथे त्यांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये तैनात असलेल्या आणि मुलाच्या विक्रीत मदत करणाऱ्या गोपीनाथ किशन धोत्रे (46) या होमगार्डला ताब्यात घेतले.

त्याच दरम्यान, ठाणे पोलिसांच्या पथकाने रत्नागिरीमध्ये जाऊन 20 दिवसांच्या बाळाचा शोध घेत बाळाला सुखरूप ताब्यात घेत, बाळाला ठाण्याला परत आणले. यावेळी पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींनाही ताब्यात घेतलं. प्रतिमा प्रकाश परब (46, डोंबिवली- पश्चिम) आणि शिल्पा प्रदीप साठे (34, दिवा) यांना 6 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले सर्व एजंट्स असून यांनी बाळाला कोणाला विकले, याचा तपास पोलीस सध्या करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. मुंब्रा पोलिसांनी अटक केलेल्या ह्या टोळीवर आणखीन कोणत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे का? याची सखोल चौकशी सध्या केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

https://www.prahaar.in/2026/11/06/kdmc-diwali-gift-titwala-tribal-hamlets-illuminated-with-streetlights-after-years-of-darkness/

दरम्यान, मुंब्रा पोलिसांनी डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि ठाणे परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व आरोपींवर मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये कलम 143(3), 143(4), 308(2), 61(2), 309(6), 352, 115(2) आणि 351(2) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here