चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या आणि पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय भूभागावर नियंत्रण प्रस्थापित केल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात होत्या. अखेर भारतीय लष्कराने या अफवांचे जोरदार खंडन केले आहे. लष्कराच्या तथ्य तपासणी विभागाने हे दावे पूर्णपणे निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले. लष्कराने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे दावे खोटे असून सीमेवरील परिस्थितीबद्दल दिशाभूल करण्यासाठी ते हेतुपुरस्सर पसरवले जात आहेत.
या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, चिनी सैन्याने पुढे सरकून त्या भागावर ताबा मिळवला आहे. परंतु त्यासाठी कोणताही ठोस पुरावा दिला गेला नव्हता. लष्कराने याला सुनियोजित आणि बनावट वर्तनाची उदाहरणे म्हटले आहे. लष्कराने ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०६ ते ७ नोव्हेंबर रोजी पहाटे १:४६ या वेळेत समान मजकूर प्रसारित करणाऱ्या सहा ‘X’ हँडलसची ओळख पटवली आहे. @SongWeilonzob1, @letmehandleyou1, @_Finding_sarah, @DarkReal09, @War_Updates5 आणि @sumit_sarkr. लष्कराने या खात्यांना पाकिस्तान प्रायोजित खाती म्हणून संबोधले आहे, जी चुकीची माहिती पसरवत होती.
🚨 Coordinated Inauthentic Behaviour Exposed
❌ Several suspected Pak-sponsored social media accounts are circulating misleading claims that Chinese forces have severely defeated Indian troops, advanced nearly 50 km into Arunachal Pradesh and established PLA control over Indian territory.
✅ These false claims are being amplified in a coordinated manner to promote a misleading anti-Indian Army narrative.
📍 @GoI_MeitY: The following 6 handles have been identified as circulating the same content between 1506 hrs on 06 November 2026 and 0146 hrs on 07 November 2026:
@SongWeilonzob1, @letmehandleyou1, @_Finding_sarah, @DarkReal09, @War_Updates5 and @sumit_sarkr.♻️ Disinformation Pattern: Fabricated Military Defeat + Exaggerated Territorial Incursion + Unsubstantiated PLA Control Claims = Misleading Anti-Indian Army Narrative.
⚠️ Always verify border-related claims through credible and official sources before sharing.
#IndianArmy
#ArunachalPradesh
#FactCheckIndia
#CognitiveCitizen
@adgpi
@easterncomd
@PIBFactCheck
@GoI_MeitY
@SpokespersonMoD— INDIAN ARMY FACT CHECK (@MythbusterXX) November 7, 2026
या पोस्टमध्ये समान भाषेचा आणि हुबेहूब सारख्याच व्हिडिओंचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये खडकाळ आणि दुर्गम प्रदेशातील सैनिक दिसत होते. लष्कराने या पोस्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही टॅग केले होते. लष्कराच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराबाबत चुकीचा समज निर्माण करण्यासाठी आणि लोकांचा लष्करावरील विश्वास कमी करण्यासाठी या पोस्ट जाणीवपूर्वक पसरवल्या जात होत्या. लष्कराने म्हटले आहे की, अशा प्रचार मोहिमा एका विशिष्ट पद्धतीनुसार चालवल्या जातात. यामध्ये काल्पनिक लष्करी पराभव, अतिरंजित प्रादेशिक घुसखोरी आणि पीएलएच्या नियंत्रणाचे निराधार दावे यांचा समावेश असतो. अशा घटना यापूर्वीही अनेक वेळा घडल्या आहेत.
लष्कराने नागरिकांना आवाहन केले आहे की, सीमेसंबंधीचे कोणतेही दावे पुढे पाठवण्यापूर्वी अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांकडून त्यांची पडताळणी करावी. सोशल मीडियावर फिरणाऱ्या मजकुरावर सहज विश्वास ठेवू नका. पडताळणी करणे अत्यावश्यक आहे, विशेषतः जेव्हा विडिओ किंवा पोस्ट्मध्ये अत्यंत नाट्यमय दावे केले जातात. जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचावी यासाठी भारतीय लष्कर नियमितपणे अशा प्रचाराचा पर्दाफाश करते. डिजिटल युगात, माहिती युद्ध हे पारंपरिक सुरक्षा आव्हानांइतकेच महत्त्वाचे बनले आहे. चुकीच्या माहितीच्या मोहात शत्रू देशांकडून मानसिक दबावाचे साधन बनू शकतात. त्यामुळे, दक्ष नागरिक बनणे आणि DGPI सारख्या अधिकृत हँडल्सवर किंवा तथ्य तपासणी करणाऱ्या खात्यांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.