उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. समाजवादी पार्टी नेते अखिलेश सिंह यादव 12 डिसेंबर रोजी आपल्या कुटुंबासह रामनगरीला भेट देणार आहेत. दुसरीकडे, दिवाळी सणानिमित्त अयोध्या लाखो दिव्यांनी उजळून निघाली आहे. अयोध्येत सलग दहा वर्षे दीपोत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत आले होते. अयोध्या सुवर्णयुगाची आठवण करून देते आणि आजची अयोध्या पुन्हा जिवंत होत आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. श्री राम हे भारताचा आत्मसन्मान आहेत. ज्या वैभवासाठी कारसेवक आणि संतांनी प्राणांचे बलिदान दिले. आता तेच वैभव पुन्हा मिळवण्याचा आज अयोध्या प्रयत्न करत आहे. असं सांगताना समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश सिंह यादव यांच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. अयोध्येत एकेकाली रामभक्तांवर गोळीबार, लाठीचार्ज आणि त्यांचा छळ केला होता, असं सांगत अखिलेस सिंह यांच्यावर हल्लाबोल केला.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश सिंह यादव यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले, ‘जेव्हा ते लोक कथेला उपस्थित राहतात, तेव्हा त्यांना कथेचे शिष्टाचारही समजत नाहीत, ते त्याला मुशायरा समजतात. पूर्वी अयोध्येत निर्बंध होते, कोणीही येत नसे. कोणीही ‘जय श्री राम’चा जयघोष करत नसे. आज, जे लोक रामाच्या विरोधात वकिलांची फौज उभी करत असत, ते त्यांचे अस्तित्व मान्य करत आहेत. हीसुद्धा आमच्यासाठी एक मोठी जमेची बाजू आहे. येथे कथेला स्वतःची प्रतिष्ठा आणि पवित्र परंपरा आहे, परंतु त्यांच्या बेबंद स्वभावामुळे ते रामाची प्रतिष्ठा आणि कथेची पवित्रता याकडे दुर्लक्ष करतात आणि तिला मुशायराच्या कक्षेत आणून अपवित्र करण्याचा प्रयत्न करतात.’
https://www.prahaar.in/2026/11/07/the-indian-air-force-has-created-history-an-il-76md-aircraft-has-performed-the-worlds-highest-altitude-landing-to-date-at-nyoma-in-ladakh/
…आधी माफी मागावी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, “ज्यांनी रामभक्तांना धमक्या दिल्या, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, संतांचा अपमान करून त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांनी अयोध्येत नक्कीच यावे, पण माफी मागितल्यानंतरच यावे. त्यांनी रामभक्तांची माफी मागावी, त्यांनी संतांची माफी मागावी, त्यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा.”