मुंबई (सचिन धानजी)
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन दिवाळीमध्ये या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे ही बैठक आता गुरुवारी होणार आहे. परंतु या बैठकीत चक्क ११२ फटाक्यांची माळ लावली जाणार असून यामधील चक्क ९० टक्क्यांहून अधिक प्रस्ताव ०५ ते ७५ लाखांच्या खर्चांचे कार्याेत्तर मंजुरीचे असल्याने दिवाळीतील या स्थायी समितीमध्ये वाजवल्या जाणारी फटाक्यांमधील ९० टक्के फटाके हे फुसकेच ठरणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/07/beaten-beaten-and-beaten-again-when-water-was-requested-they-poured-something-into-the-mouth-vaijapur-murder-case-causes-a-stir-guardian-minister-visits-the-victims-family/
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सोमवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती, परंतु शासनाने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे आता ही बैठक येत्या गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १२ वाजता होणार आहे. यामध्ये ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये १८ प्रस्ताव विविध कामांचे असून ९४ प्रस्ताव हे यापूर्वी प्रशासनाकडे परत पाठवलेले विभाग कार्यालय आणि विभागाच्यावतीने पाच ते पंचाहत्तर लाखांपर्यंत खर्च केेले जातात, त्याचे प्रस्ताव पटलावर ठेवले आहेत. विभाग कार्यालय आणि विभागाच्यावतीन कलम ७३ (३ )अन्वये ०५ ते ७५ लाखांपर्यंतच्या विकासकामांवर खर्च केला जातो. आणि हा खर्च बेसुमार वाढल्यामुळे हे प्रस्ताव स्थायी समितीने विचारात न घेण्याचा पावित्रा घेतला होता. तसेच अशाप्रकारच्या बेसुमार खर्चाला अ आळा घालण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे केली होती. त्यानंतर स्थायी समितीत अशाप्रकारचे प्रस्ताव न घेण्याचा निर्णय झाल्यामुळे महापालिका सचिव विभागाच्यावतीने हे प्रस्ताव स्वीकारले जात नव्हते.
त्यानंतर आता अशाप्रकारचे प्रस्ताव पुन्हा एकदा स्वीकारले जात असून या समितीच्या पटलावर तब्बल ९४ प्रस्ताव हे पाच ते पंचाहत्तर लाखांपर्यंतच्या खर्चाचे आहेत. तर उर्वरीत १८ प्रस्तावांमध्ये अग्निशमन दलाच्या विविध ठिकाणी सौर ऊर्जा पॅनेल बसवणे, पाणी पुरवठा, सांडपाणी यासाठी सल्लागार नेमणे, लोकमान्य टिळक रुग्णालयात ११ महिन्यांकरता कंत्राटी कामगार नेमणे, विधी विभागाचा आकृतीबंध, प्लाझ्मा तंत्रज्ञान आधारी कचरा विल्हेवाट लावणे, भांडुप संकुल, आपत्कालिन व्यवस्थापन विभागात आऊटडोअर एलईडी वाल बसवणे, मालत्ता पत्रकावर महापालिकेचे नाव चढवणे या कामांसाठी सल्लागार नेमणे, तसे टाऊन हॉल जिमखाना आदी प्रस्ताव सादर केले आहे. त्यामुळे ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केलेले असले तरी त्यातील ९० टक्के प्रस्ताव केवळ माहितीकरता असून उर्वरीत १८ प्रस्तावांची वात लावली तरी त्यांचा मोठा आवाज होईल अशाप्रकारे नसल्याने स्थायी समितीच्या आगामी बैठकीत दिवाळीच्या दिवसांत ११२ फटाक्यांची माळ नुसताच फुसका बार ठरेल असे दिसून येत आहे.