Home ताज्या घडामोडी Weather Update: दिवाळीतही मुंबईकरांना उकाड्याचा चटका! गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

Weather Update: दिवाळीतही मुंबईकरांना उकाड्याचा चटका! गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

0
Weather Update: दिवाळीतही मुंबईकरांना उकाड्याचा चटका! गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

Weather Update: दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही मुंबईमध्ये गुलाबी थंडी पडलेली नाही. मुंबईत शनिवारी हवामान उष्ण आणि बऱ्यापैकी कोरडे राहिले आहे. शहरात मंद वारे वाहत असले तरी, उष्णता कमी होण्यास फारसा हातभार लागलेला नाही. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि कमाल तापमान सुमारे 35°C पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ वातावरण आणि कोरडे हवामानाचा अभाव यांमुळे ऑक्टोबरची उष्णता नोव्हेंबरमध्येही कायम असून, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबईकरांना खऱ्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मुंबईचा एकूण वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 111 ते 154 च्या आसपास नोंदवला गेला आहे, जो ‘खराब’ (Poor/Unhealthy) श्रेणीत येतो. आज शहराच्या क्षितिजावर, विशेषतः मरीन ड्राइव्हच्या परिसरात, धुरके आणि धुरकट धुक्याची चादर पसरलेली दिसत होती. मात्र, मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीतच असल्याने, प्रदूषणाच्या या थरामुळे चिंता वाढली आहे. शनिवारी सकाळी किमान तापमान 26°C नोंदवण्यात आले असून, दिवसाचे कमाल तापमान 35°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच ते सहा दिवस शहरात असेच हवामान राहणार असल्याची शक्यता वारवण्यात येत असून सणासुदीच्या काळात त्यात फारसा बदल अपेक्षित नाही.(Weather Update)

https://www.prahaar.in/2026/11/06/narak-chaturdashi-2026-when-exactly-is-narak-chaturdashi-november-7-or-8-find-out-the-auspicious-timing-shubh-muhurat-for-the-abhyanga-snan-ritual-bath/

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत उष्णता आणि आर्द्रता जाणवत आहे, त्यामुळे हिवाळा सुरू होण्याची कोणतीही तात्काळ चिन्हे अद्यापतरी दिसत नाहीत.तापमानात गेल्या काही दिवसांत थोडी घट झाली होती, परंतु आताच्या अंदाजानुसार हा दिलासा फार काळ टिकणार नाही. वाऱ्याचा कमी वेग आणि हवेतील आर्द्रता यांमुळे प्रदूषक कण जमिनीच्या जवळच साचून राहत आहेत. तसेच शहरातील विविध बांधकामे आणि वाहतुकीची कोंडी यामुळे प्रदूषणात भर पडत असून याचा थेट परिणाम हवामानावर होताना दिसत आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी किंवा उत्सवासाठी बाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here