Home ब्रेकिंग न्यूज MPSC : MPSC भरतीत मोठी वाढ; गट-कच्या आता 16,717 पदांसाठी परीक्षा, उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

MPSC : MPSC भरतीत मोठी वाढ; गट-कच्या आता 16,717 पदांसाठी परीक्षा, उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

0
MPSC : MPSC भरतीत मोठी वाढ; गट-कच्या आता 16,717 पदांसाठी परीक्षा, उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 5,707 पदांसाठी होणाऱ्या या भरतीत आणखी 11,010 पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण 16,717 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( MPSC )

https://www.prahaar.in/2026/11/07/ghatkopar-fire-fire-breaks-out-on-the-23rd-floor-of-a-building-in-ghatkopar-3-people-injured-residents-safely-evacuated/

आधीच्या तुलनेत 11 हजारांहून अधिक पदांची भर

MPSC ने 25 जून 2026 रोजी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 2,619 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धिपत्रकाद्वारे आणखी 3,088 पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पदसंख्या 5,707 झाली होती. आता नव्याने 11,010 पदे वाढवण्यात आल्याने एकूण पदसंख्या 16,717 वर पोहोचली आहे.

राज्य शासनाने भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाला प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांनुसार पदसंख्या वाढवण्यात आली आहे.

13 ते 27 नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येणार

वाढीव पदांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांचे विकल्पही सादर करता येतील. मात्र, अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

नवीन अर्ज आणि विकल्प सादर करण्यासाठी 13 ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोगाच्या वेबसाइटवर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार

विद्यमान आणि नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन म्हणजेच OMR पद्धतीने होईल. यासाठी आयोगाच्या वेबसाइटवर 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू राहणार आहे.

सामान्य शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गांची मुख्य परीक्षा निर्धारित योजना आणि अभ्यासक्रमानुसार होईल. तर विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.

वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता

सामान्य प्रशासन विभागाच्या 5 नोव्हेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, शासन सेवेत प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी पात्र उमेदवारांनाही मिळणार आहे.

24 जानेवारी 2027 रोजी पूर्व परीक्षा

पदसंख्या वाढल्यामुळे उमेदवारांना नव्याने अर्ज आणि विकल्प सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 3 जानेवारी 2027 रोजी होणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 24 जानेवारी 2027 रोजी घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी पदसंख्या, अर्ज प्रक्रिया, विकल्प आणि परीक्षेच्या तारखेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी MPSC च्या अधिकृत वेबसाइटवरील शुद्धिपत्रक तपासावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here