घाटकोपर : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कुकरजा पॅलेस या उंच इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. 6 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8:08 वाजता ही आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाने सुरुवातीला लेव्हल-1 आणि त्यानंतर लेव्हल-2 चा कॉल घोषित केला. या घटनेत 3 जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/governor-signs-ordinance-on-government-appointed-directors-for-gokul-paves-the-way-for-granting-voting-rights/
आगीवर नियंत्रण, इमारत रिकामी
घाटकोपर पूर्वेतील पंतनगर परिसरातील वल्लभ बाग लेन येथे कुकरजा पॅलेस ही तळमजला अधिक 25 मजल्यांची निवासी इमारत आहे. या इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीत कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी शोधमोहीमही सुरू करण्यात आली.
घाटकोपर (पूर्व) येथील वल्लभ बाग लेन परिसरातील ‘रॉयल अल्टेझा’ (Royal Altezza) या २१ मजली निवासी इमारतीच्या २० व्या मजल्यावर आज रात्री ८ च्या सुमारास आग लागली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्याची पाहणी केली आणि विविध यंत्रणांमध्ये थेट समन्वय साधला.
यावेळी स्थानिक आमदार श्री. पराग शाह, स्थानिक नगरसेवक श्री. सुरेश आवळे आणि नगरसेवक श्री. धर्मेश गिरी हेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
मुंबई अग्निशमन दलाने ही आग ‘लेव्हल-२’ (Level-II) घोषित करत जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत तातडीने रिकामी करण्यात आली.
मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे स्थानिक प्रभाग कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर मदतकार्य राबवले.
या दुर्घटनेत बाधित झालेल्या तीन व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
इमारतीमध्ये इतर कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी अग्निशमन दलाकडून कसून शोधमोहीम पूर्ण करण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
#GhatkoparFire #RoyalAltezza #GhatkoparEast #SafetyFirst #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika
@ParagShahBJP @mybmc
— Ritu Tawde (@TawdeRitu) November 6, 2026
तीन जण जखमी; प्रकृती स्थिर
या आगीत साईनाथ आवळे (45) हे 27 टक्के भाजले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या निरव लोढाया (34) आणि राजेश लोढाया (47) यांनाही झिनोव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.