Home ताज्या घडामोडी Narak Chaturdashi 2026 : नरक चतुर्दशी नेमकी कधी 7 की 8 नोव्हेंबर? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय जाणून घ्या

Narak Chaturdashi 2026 : नरक चतुर्दशी नेमकी कधी 7 की 8 नोव्हेंबर? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय जाणून घ्या

0
Narak Chaturdashi 2026 : नरक चतुर्दशी नेमकी कधी 7 की 8 नोव्हेंबर? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय जाणून घ्या

Narak Chaturdashi 2026 : दिवाळीला (Diwali 2026) सुरुवात झाली आहे. सगळीकडे रोषणाई, दिवे, फटाक्यांची आतिषबाजी, फराळ यांची सगळीकडे रेलचेल आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केलेली जाते. त्यानुसार आज म्हणजेच 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातोय. तर, छोटी दिवाळी म्हणून ओळखली जाणारी नरक चतुर्दशी नेमकी कधी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 7  की 8 नोव्हेंबर? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? असा प्रश्न तुम्हाला ही पडलाय?

नरक चतुर्दशी 2026
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांपासून ही तिथी सुरु होणार असून 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे. मात्र, तिथीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/06/shehzad-poonawalla-winner-of-rise-and-fall-season-2-donates-the-prize-money-for-relief-efforts-for-flood-victims-in-bihar-and-assam/

अभ्यंग स्नान शुभ मुहूर्त 2026
नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 41 मिनिटांपासून सुरु होऊन तो 06 वाजून 38 मिनिटांपर्यंत असणार आहे.या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नान करावं. या दिवशी अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. तसेच, या दिवशी नवीन कपडे परिधान करावेत. दिव्यांनी घर प्रज्वलित करावं.

या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा आहे. सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करावी. अंगाला तेल आणि उटणे लावून सुगंधी पाण्याने स्नान करावे. या स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. देवाला गोड पदार्थ, फळे आणि फराळाचा नैवेद्य दाखवावा. भगवान श्रीकृष्णाची आरती करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here