फोटो सौजन्य : ANI
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला लँकेशायरने संघातून मुक्त केले आहे. मात्र एका नवीन संघाने त्याच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
फोटो सौजन्य : ANI
जेम्स अँडरसन पुढील हंगामात सरे संघाकडून काउंटी क्रिकेट खेळू शकतो. सरेने अनुभवी वेगवान गोलंदाजाशी करार करण्यासाठी संपर्क साधला आहे.
फोटो सौजन्य : ANI
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेला अँडरसन संघात सामील होईल, अशी सरेला आशा आहे.
फोटो सौजन्य : ANI
लँकेशायरसोबतचा करार संपल्यानंतर 44 वर्षीय अँडरसन उपलब्ध झाला. लँकेशायरने पुढील हंगामासाठी त्याचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
फोटो सौजन्य : ANI
अँडरसन निवृत्तीचा विचार करत होता, पण आता त्याने खेळणे सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. आता सरेकडून खेळण्याची शक्यता आहे.
फोटो सौजन्य : ANI
लँकेशायर संघ गेल्या हंगामात डिव्हिजन टूमध्ये होता. तर सरे डिव्हिजन एकमध्ये आहे. सरेमध्ये सामील झाल्यास अँडरसनला कसोटी स्तरावर विजेतेपद जिंकण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
फोटो सौजन्य : ANI