विराट कोहलीची रनमशिन म्हणून ख्याती आहे. पण टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याच्या धावांना काहीसा ब्रेक लागला. असं असूनही वनडे क्रिकेटमध्ये त्याची धावांची गाडी सुसाट सुटली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडेल, असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे. असं असलं तरी हा फार मोठा पल्ला आहे. पण वेलिंग्टनमध्ये कोहली सचिनच्या शतकांच्या विक्रमांपैकी एक विक्रम मोडू शकतो. (Photo: ANI)भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीकडे सचिनचा लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. जर कोहलीने या सामन्यात शतक झळकावले, तर तो सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. (Photo: ANI)विराट कोहलीने आतापर्यंत वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 55 शतके झळकावली आहेत. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला कधीच मागे टाकले आहे. मात्र, लिस्ट ए क्रिकेटमध्ये म्हणजेच सर्व प्रकारच्या वनडे सामन्यात सचिन आणि कोहली यांची शतके समान आहेत. भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गजांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रत्येकी 60 शतके झळकावली आहेत. आता विराटला हा विक्रम मोडण्यासाठी एका शतकाची गरज आहे. (Photo: ANI)दुसरीकडे, रिकी पाँटिंगचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त एक धाव करायची आहे. हा विक्रम न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा आहे. या फॉरमॅटमध्ये कोहली आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यांनी न्यूझीलंडविरुद्ध समान 1971 धावा केल्या आहेत. कोहलीने या धावा 37 डावांमध्ये, तर पाँटिंगने 50 डावात हा पल्ला गाठला आहे. म्हणजे विराटने एक धाव घेताच हा विक्रम नावावर करेल. (Photo: ANI)न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या रडारवर आहे. सचिन तेंडुलकरने 80 डावांमध्ये 3345 धावा, जो रूटने 3268 धावा, विराट कोहलीने 3241 धावा केल्या आहेत. विाटने 105 धावा केल्या तर सचिनचा शतकांचा विक्रमासह, न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडेल. (Photo: ANI)