Home क्रीडा IND vs NZ: ऋषभ पंत इंडिया ए संघातून आऊट, कसोटी मालिकेतही खेळणं कठीण

IND vs NZ: ऋषभ पंत इंडिया ए संघातून आऊट, कसोटी मालिकेतही खेळणं कठीण

0
IND vs NZ: ऋषभ पंत इंडिया ए संघातून आऊट, कसोटी मालिकेतही खेळणं कठीण
IND vs NZ: ऋषभ पंत इंडिया ए संघातून आऊट, कसोटी मालिकेतही खेळणं कठीण (Photo: ANI)

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेवर भारताचं अंतिम फेरीत खेळण्याचं गणित ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेसाठी रणनिती आखत आहे. असं असताना भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण विकेटकीपर फलंदाज असलेला ऋषभ पंत कसोटी मालिकेत खेळणं कठीण दिसत आहे. डावखुरा फलंदाज न्यूझीलंड ए विरुद्धच्या सामन्यातून आऊट झाला आहे. पंतला अद्याप बरगडीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये रिहॅब सुरू आहे. त्यामुळे पंत 19 नोव्हेंबरला होणाऱ्या वेलिंग्टन कसोटी सामन्यात खेळणं कठीण आहे. जर असं झालं तर ध्रुव जुरेलला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

न्यूझीलंड ए विरुद्धच्या सामन्यात बुमराह-जडेजा खेळणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत जागा मिळवण्याच्या हेतून संघाची बांधणी केली जात आहे. शेवटच्या दोन वनडे सामन्यात शुभमन गिल खेळणार नाही. कारण कसोटी सामन्याची तयारी करायची आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे लक्ष लागून होतं.आता हे दोन्ही खेळाडू न्यूझीलंड ए विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बुमराहन न्यूझीलंडला पोहोचल्यानंतर दोन दिवस सराव केला. तर जडेजा सौराष्ट्रसाठी दोन रणजी ट्रॉफी सामने खेळून या मालिकेसाठी आला आहे. त्याने या सामन्यात सात विकेट आणि शतक ठोकलं होतं. दुसरीकडे, तिलक वर्माही शनिवारपासून लिंकन येथे सुरू होणाऱ्या औपचारिक सामन्यात खेळणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/05/why-did-ambati-rayudu-say-that-hardik-pandya-should-step-down-as-captain/

ध्रुव जुरेल इंडिया ए संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीही खेळणार आहे. प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मागच्या तीन आठवड्यापासून प्रसिद्ध कृष्णा दुखापतीच्या कारणामुळे मैदानापासून दूर होता. आता फिट असून त्याला सर्व फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. खरं तर प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून कमबॅक करणार होता. पण आता थेट कसोटी संघात खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here