Home महाराष्ट्र नाशिक निदा खानला ३५ दिवस मदत करणारा इम्तियाज जलील मुख्य आरोपी – संजय शिरसाट यांचा दावा; संपूर्ण कारस्थान जलील यांनी रचल्याचा आरोप

निदा खानला ३५ दिवस मदत करणारा इम्तियाज जलील मुख्य आरोपी – संजय शिरसाट यांचा दावा; संपूर्ण कारस्थान जलील यांनी रचल्याचा आरोप

0
निदा खानला ३५ दिवस मदत करणारा इम्तियाज जलील मुख्य आरोपी – संजय शिरसाट यांचा दावा; संपूर्ण कारस्थान जलील यांनी रचल्याचा आरोप

मुंबई : नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. निदा खानला नाशिकमधून बाहेर काढण्यापासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आणेपर्यंत आणि पुढील ३५ दिवस तिला मदत करण्यापर्यंतच्या घडामोडींमध्ये जलील यांची भूमिका असल्याचा आरोप सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी जलीलच असून, त्यांना तुरुंगात जावे लागेल, असा दावाही त्यांनी केला.

निदा खानला नाशिकमधून पळवून मुंब्र्यात नेण्यात आले आणि तेथून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत जलील यांनी मदत केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. मतीन पटेल हा या प्रकरणातील मोहरा होता, तर संपूर्ण कारस्थान जलील यांनी रचल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे शिरसाट म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/11/06/big-news-for-st-bus-passengers-extension-of-deadline-for-ncmc-card-for-women-and-senior-citizens/

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी जलील यांचे व्हॉइस मेसेज आणि कॉलचे नमुने तपासले. त्यांची जुळवणी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिरसाट यांनी सांगितले. निदा खान सुमारे ३५ दिवस येथे राहत होती. तिची आई आणि मावशीही काही दिवस येथे राहिल्या होत्या. त्यांच्याशी जलील यांच्या सांगण्यावरून संवाद साधला जात होता, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास केल्याचे सांगत शिरसाट यांनी तपास यंत्रणेचे अभिनंदन केले.

दरम्यान, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही भागांत धर्मांतरासाठी टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलीस त्या दिशेने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणे ही या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड असल्याचेही शिरसाट यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here