Home एक्सक्ल्युजिव्ह Mumbai Drain Cleaning : नालेसफाईच्या कामांवरील खर्च कमी करणार

Mumbai Drain Cleaning : नालेसफाईच्या कामांवरील खर्च कमी करणार

0
Mumbai Drain Cleaning : नालेसफाईच्या कामांवरील खर्च कमी करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

मुंबईतील नाल्यांच्या सफाईच्या कामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जाते. दरवर्षी पावसाळा पूर्व आणि पावसाळ्या दरम्यान तसेच पावसाळ्यानंतर गाळाची सफाई करणे बंधनकारक आहे. परंतु पावसाळापूर्व नाल्यातील गाळाची सफाईचे काम करणे बंधनकारक असतानाही कंत्राटदारांकडून सफाईचे योग्यप्रकारे केले जात नाही. तसेच झोपडपट्टी वस्त्यांमधून मोठ्याप्रमाणात कचरा फेकला जात असल्याने नाले कचऱ्याने तुडुंब भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तरंगता कचऱ्याची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने आता सर्वच नाल्यांवर जाळ्या बसवण्याचा विचार केला असून यासाठी तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी हरकतीच्या मुदद्याद्वारे मुंबई शहरातील रेसकोर्स नाला, कोरबा मिठागर नाला, क्लीव लँड नाला, संगम नगर नाला, जे.के केमिकल्स नाला, वडाळा ट्रक टमिनल नाला, दादर धारावी नाला यासर्व नाल्यांची सफाई करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हे सर्व नाले कचऱ्याने भरलेले आहेत. संगम नगर नाला कचऱ्याने एवढा भरला आहे की पोलिस चौकीची खिडकी दुर्गंधीमुळे उघडली जात नाही. कोरबा मिठागर नालाही भरलेला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून प्रशासन मात्र, याच उत्तर द्यायला तयार नाही,अशा मुद्दा उपस्थित केला.

https://www.prahaar.in/2026/11/06/municipal-commissioner-reviews-preparations-for-mahaparinirvan-diwas/

यावर सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी कुर्ला संजय नगरमधील नाल्याची सफाई केली होती. परंतु आजही तो नाला भरलेला आहे. अतिरिक्त आयुक्तांनी विनंती करून संबंधित कंत्राटदाराला सफाई करण्यास भाग पाडले होते. परंतु या नाल्याची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारित येणाऱ्या भूखंडावरून जाणारे नाले आणि आऊटफॉल याची सफाई होत नसून संबंधित प्राधिकरणे ही कामे करू देत नसल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिवलकर यांनी सांगितले. तर पोयसर नालाही कचऱ्याने भरला असून त्यावरील कचऱ्याने फटाक्यांमुळे पेट घेतल्याचे शिवकुमार झा यांनी सांगितले. भाजपच्या राखी जाधव यांनी गोदरेज नाल्याचे काम न झाल्याने नाराजी व्यक्त केली. श्रध्दा जाधव यांनी संगमनगर नाला, जे. के.केमिकल्स नाला भरल्याच्या तक्रारी स्थानिक नगरसेवकानेही केलेली आहे. पाऊस नाही, तरीही नाल्यांमधील पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरत असल्याचे सांगितले.

यावर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी नाल्यातील तरंगता कचरा आणि आतील गाळ हे दोन प्रकार असून भांडुपमधील ५ किलोमीटर लांबीचा नाल्याची सफाई महापालिकेने एनजीओ मार्फत केली. तिथे २० टक्के गाळ काढला गेला, पण तिथे पाणी भरले नाही. त्यामुळे पुढील वेळेस २० टक्के गाळ काढण्याचे अंदाजित पत्रक बनवले जाईल. नालेसफाईच्या कामांवर आपण २०० ते २५० कोटी रुपये खर्च करतो. परंतु यामध्ये तरंगता कचरा हीच मोठी समस्या आहे. त्यामुळे जो कंत्राटदार कामचुकारपणा करणार त्याला महापालिका सोडणार नाही. पण तरंगता कचरा हीच जर समस्या असेल तर यासाठी झोपडपट्टी वस्त्यांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी नाल्याच्या उंचीवर जाळ्या बसवण्याचा विचार आहे. मुंबईतील सर्व ठिकाणी अशाप्रकारच्या जाळ्या बसवण्यासाठी ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. नालेसफाईसाठी २०० ते २५० कोटी रुपये खर्च येणार असून हा प्रयोग केल्यास नालेसफाईचा खर्चही भविष्यात कमी होईल असे अतिरिक्त आयुक्त अभिषेक बांगर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here