Home ब्रेकिंग न्यूज इमरान हाशमीचा खतरनाक अवतार! ‘गनमास्टर जी9’चे नवीन पोस्टर रिलीज; बॉक्स ऑफिसवर होणार महाक्लॅश!

इमरान हाशमीचा खतरनाक अवतार! ‘गनमास्टर जी9’चे नवीन पोस्टर रिलीज; बॉक्स ऑफिसवर होणार महाक्लॅश!

0
इमरान हाशमीचा खतरनाक अवतार! ‘गनमास्टर जी9’चे नवीन पोस्टर रिलीज; बॉक्स ऑफिसवर होणार महाक्लॅश!

मुंबई: बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याचा आगामी हाय-वोल्टेज ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘गनमास्टर जी9’ (Gunmaster G9) च्या निर्मात्यांनी नुकताच एक नवीन आणि धमाकेदार मोशन पोस्टर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये इमरान हाशमी एका अतिशय आक्रमक आणि डॅशिंग अवतारात दिसत असून, त्याच्या मागे तीव्र ॲक्शन सीन्सची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या मोशन पोस्टरमधील इम्रानचा एक दमदार संवाद—“जर तू माझ्या प्रेमाच्या जगात पाऊल ठेवलेस, तर या जगातून कायमचा निघून जाशील”—प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा आहे.

आदित्य दत्त यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात इमरान हाशमीसोबत लोकप्रिय अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia Deshmukh) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय, अभिनेता अपारशक्ती खुराना देखील एका अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, आता या नवीन मोशन पोस्टरने चित्रपटातील ॲक्शन आणि थ्रिलबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/05/jailer-2-ott-release-date-announced-rajinikanth-tiger-muthuvel-pandian-swag-back-on-prime-video/

‘सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट प्रा. लि.’ च्या बॅनरखाली निर्मित झालेला हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 27 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा प्रवास सोपा असणार नाही. 27 नोव्हेंबरलाच अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर इमरान हाशमी विरुद्ध आयुष्मान खुराना अशी थेट आणि चुरशीची टक्कर पाहायला मिळणार असून, प्रेक्षकांना कोणता सिनेमा अधिक आवडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here