भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून वनडे मालिका सुरू आहे. त्यानंतर कसोटी मालिका होईल आणि भारतीय संघ मायदेशी परतेल. असं असताना बीसीसीआय मात्र भारतीय संघाच्या पुढच्या नियोजनाची तयारी करत आहे. डिसेंबर महिन्यात श्रीलंकेचा सघ भारतात व्हाईट बॉल मालिकेसाठी येणार आहे. या दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेला 13 डिसेंबरपासून सुरूवात होणार असून पहिला दिल्लीतील अरूण जेटली मैदानात खेळण्याचं आयोजन केलं होतं. पण अचानक पहिल्या वनडे सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. आता हा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 5 नोव्हेंबर रोजी एक प्रसिद्धीपत्रक काढत या बदलाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे स्थळ विनंती केली होती. या विनंतीचा उल्लेखही या पत्रकात करण्यात आला आहे.
दिल्लीतील खराब हवामान आणि स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे दिल्ली क्रिकेट बोर्डाने ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. बीसीआयने आपल्या पत्रकात स्पष्ट केलं की, “दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विनंतीनुसार सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. हवामानातील संभाव्य अडचणी आणि स्टेडियममधील प्रस्तावित नूतनीकरणाची कामे लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.” बीसीसीआयने पुढे स्पष्ट केलं की, “हा सामना आता 13 डिसेंबर 2026 रोजी विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.”
🚨 News 🚨
First ODI between India and Sri Lanka to be held on December 13 shifted from Delhi to Visakhapatnam
More details 🔽 | #TeamIndia | #INDvSL | @mflone_
https://t.co/P9wJkuYdtJ
— BCCI (@BCCI) November 5, 2026
https://www.prahaar.in/2026/11/05/why-did-ambati-rayudu-say-that-hardik-pandya-should-step-down-as-captain/
भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
- रविवार, 13 डिसेंबर, 2026, दुपारी 2.00 वाजता, पहिला एकदिवसीय सामना (विशाखापट्टणम)
- बुधवार, 16 डिसेंबर 2026, दुपारी 2.00 वाजता, दुसरी वनडे (बंगळुरू)
- शनिवार, 19 डिसेंबर 2026, दुपारी 2.00 वाजता, तिसरा एकदिवसीय सामना (अहमदाबाद)
- मंगळवार, 22 डिसेंबर, 2026, सायंकाळी 7.00 वाजता, पहिला टी20 (राजकोट)
- गुरुवार, 24 डिसेंबर, 2026, सायंकाळी 7.00 वाजता, दुसरी टी20 (कटक)
- रविवार, 27 डिसेंबर 2026, सायंकाळी 7.00 वाजता, तिसरी टी20 (पुणे)