Home फोटो गॅलरी Mangal Prabhat Lodha: केवळ 300 चौ. फुटांत सुरू होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र! महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना मान्यता

Mangal Prabhat Lodha: केवळ 300 चौ. फुटांत सुरू होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र! महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना मान्यता

0
Mangal Prabhat Lodha: केवळ 300 चौ. फुटांत सुरू होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र! महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना मान्यता
मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले (Photo: Prahaar)
मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ झाला. युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या शासनाच्या संकल्पाला यामुळे नवी दिशा मिळणार आहे. (Photo: Prahaar)
राज्यात कौशल्य प्रशिक्षणाचा विस्तार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 12 केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. नागपूर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे सुरू होणार आहेत. (Photo: Prahaar)
कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जागेच्या निकषांमध्ये शासनाने शिथिलता दिली आहे. आता किमान 300 ते 1500 चौरस फुटांच्या जागेत प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे. यामुळे स्थानिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना कौशल्य विकासाच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. (Photo: Prahaar)
महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणपत्र आणि रोजगार यांची सांगड घालण्यात येणार असून, उमेदवारांकडून कोणतेही प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार नाही. युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. (Photo: Prahaar)
ग्रामीण, शहरी, आदिवासी, डोंगराळ आणि दुर्गम भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर युवा महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Photo: Prahaar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here